Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

mosami kewat by mosami kewat
March 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
'हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

'हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना स्पष्ट केले आहे की, अनुसूचित जातीतील (SC) एखाद्या व्यक्तीने हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारल्यास त्याला अनुसूचित जातीचा दर्जा लागू राहणार नाही. तसेच अशा धर्मांतरित व्यक्तींना SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संरक्षण मिळणार नाही.

हा निर्णय एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान देण्यात आला. ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीने अत्याचार प्रकरणी तक्रार दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या अनुसूचित जातीचा राहात नाही. (Scheduled Caste)

दिल्लीला वेढा घालुया!

घटनात्मक तरतुदीनुसार, अनुसूचित जातीसाठी पात्रता केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीयांपुरती मर्यादित आहे. 1950 च्या राष्ट्रपती आदेशाचा आधार घेत न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

न्यायालयाने पुढे असेही नमूद केले की, धर्मांतर केल्यास मूळ जातीय ओळख कायदेशीरदृष्ट्या संपुष्टात येते. ख्रिश्चन धर्मात जातिव्यवस्था अधिकृतपणे मान्य नसल्याचा उल्लेखही करण्यात आला. या प्रकरणात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळली. धर्मांतरामुळे अनुसूचित जातीचे हक्क लागू होत नाहीत, हा उच्च न्यायालयाचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केला. (Scheduled Caste)

निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

प्रकरणाचा तपशील असा की, पास्टर चिंथडा आनंद यांनी जातीय छळ आणि धमक्यांचा आरोप करत SC/ST कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी एफआयआरही नोंदवला होता. मात्र, आरोपींनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मे 2025 मध्ये उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द करत धर्मांतरामुळे SC हक्क लागू होत नसल्याचे नमूद केले होते. त्या निर्णयाविरोधात आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

Tags: breakingnewsConstitution OfIndiaCourt RulingIndia NewsIndianLawJudiciaryLaw And OrderLegal NewsReligiousConversionSC VerdictScheduledCasteSCSTActSocialJusticesupreme court
Previous Post

दिल्लीला वेढा घालुया!

Next Post

पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

Next Post
पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड!
बातमी

उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड!

by mosami kewat
April 13, 2026
0

नवी मुंबई : उलवे परिसरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीचा LED बोर्ड बसविण्याच्या कामादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण...

Read moreDetails
नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

April 13, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

April 13, 2026
आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज

आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज

April 13, 2026
रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

April 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home