Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

mosami kewat by mosami kewat
April 13, 2026
in बातमी, सामाजिक, सांस्कृतिक
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा
       

पुणे : १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भीम जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील अनेक भागांत आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

या दिवशी मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा केला जाणार असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शहरातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, व्याख्याने तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व स्तरातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)

या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि पीएमपीएलने विशेष नियोजन केले आहे. १३ आणि १४ एप्रिलदरम्यान अनेक मार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

१३ एप्रिल दुपारी ४ वाजल्यापासून ते १४ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत दांडेकर पूल परिसरातील बस मार्ग वळवण्यात येणार आहेत. काही बस सानस पुतळा, निलयम टॉकीज, मंगीर बाबा चौक आणि लोकमान्य नगर मार्गे धावतील, तर इतर बस सारसबाग, सेनादत्त पोलीस चौकी, राजेंद्रनगर, म्हसोबा चौक आणि दत्तावाडीमार्गे वळवण्यात येतील. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)

पुणे रेल्वे स्थानकाजवळ वाहतुकीत बदल – 

पुणे स्टेशन परिसरात मोठी गर्दी होत असल्यामुळे, ससून रोड आणि मालधक्का येथून सुटणाऱ्या बसेस आता पेटिट बस स्थानकावरून चालवण्यात येतील. परतीच्या मार्गात वाडिया कॉलेज आणि अलंकार चौक मार्गे सेवा दिली जाईल. तसेच काही बस मार्ग साधू वासवानी चौक, नरपतगिरी चौक, केईएम हॉस्पिटल आणि रस्ता पेठ परिसरातून वळवण्यात येणार आहेत.

वडगाव शेरी-खराडी भागातही बदल – 

१४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते मध्यरात्रीदरम्यान वडगाव शेरी आणि खराडी परिसरात रस्ते बंद झाल्यास काही बस सेवा मर्यादित केल्या जातील. पर्यायी मार्ग म्हणून नगर रोड, चंदननगर बायपास आणि दुर्गा माता मंदिर परिसरातून बसेस धावतील. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)

पिंपरी चौकात विशेष वाहतूक नियोजन –

पिंपरी चौकात १३ एप्रिल दुपारी ३ ते १४ एप्रिल पहाटे २ वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू राहतील. अनेक बस डेअरी फार्म ग्रेड सेपरेटरमार्गे वळवण्यात येतील, तर काही मार्ग ऑटो क्लस्टर, मदर तेरेसा ब्रिज आणि विजयनगरमार्गे चालवले जातील.

सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान रहाटणी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर सुमारे १४ मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे या मार्गावर सर्वसामान्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच काही भागात अवजड वाहनांनाही प्रवेश दिला जाणार नाही. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी काळेवाडी फाटा आणि पीके चौक या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. हे निर्बंध सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत लागू राहतील. आपत्कालीन सेवांना मात्र सूट देण्यात आली आहे.


       
Tags: Bhim jayantiBucelebrationConstitutionDr Babasaheb AmbedkarindiaIndia bhim jayantiMaharashtrapimpari chinchwadPimpari Chinchwad trafficpolticspunePune trafficroadVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज

Next Post

नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

Next Post
नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती
बातमी

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

by mosami kewat
July 28, 2026
0

औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील सुनावणी आज न्यायालयात पार पडली. या प्रकरणात पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय स्वतः नियमावली (गाईडलाईन्स) तयार...

Read moreDetails
पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

July 28, 2026
औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

July 28, 2026
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

July 28, 2026
कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home