Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

दिल्लीला वेढा घालुया!

mosami kewat by mosami kewat
March 24, 2026
in राजकीय, संपादकीय, सामाजिक
0
दिल्लीला वेढा घालुया!

दिल्लीला वेढा घालुया!

       

– धनंजय कांबळे

नागपूरच्या भूमीतून उठलेला आवाज हा केवळ एका मोर्चाचा गजर नाही, तर तो हुकुमशाही सत्तेच्या किल्ल्याला लावलेला सुरुंग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर निघालेला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा हा भारतीय राजकारणातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा मोर्चा भाजप आणि RSS विरोधातील जनतेच्या भावनांचा स्फोट आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये उठवलेला आवाज हा केवळ एका नेत्याचा नाही, तो बहुजनांचा, वंचितांचा आणि भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या सामान्य माणसाचा आवाज आहे. आणि जेव्हा हा आवाज दिल्लीकडे वळतो, तेव्हा सत्तेच्या भिंती हलू लागतात, हे इतिहासाने वेळोवेळी दाखवून दिले आहे, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे.

आज देशात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे राष्ट्रवादाची व्याख्या ठरते, आणि जो प्रश्न विचारतो, त्याला देशद्रोही ठरवले जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS प्रमुख मोहन भागवत यांना आंबेडकर यांनी विचारलेले प्रश्न हे कुठल्याही राजकीय सूडाचे नव्हे, तर लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणारे आहेत. राफेलसारख्या संवेदनशील मुद्द्यावर पारदर्शकता असली पाहिजे म्हणणे हा देशविरोध नाही तर तो देशभक्तीचाच उच्चतम प्रकार आहे.

पण प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न गेल्या 10-12 वर्षांपासून सुरू आहे. “जेलमध्ये टाका, दबाव टाका, आवाज बंद करा” हीच सध्याच्या सत्तेची नीती आहे का? जर तसे असेल, तर हा लोकशाहीचा नव्हे, तर हुकूमशाहीचा मार्ग आहे, हे स्पष्टपणे सांगावे लागेल.

नागपूरमध्ये भाजी-भाकरी बांधून आलेली जनता ही फक्त आंदोलनासाठी आलेली नव्हती…हा देश आमचा आहे आणि तो बाबासाहेबांच्या संविधानानेच चालेल हे ठणकावून सांगण्यासाठी आली होती. आंदोलकांच्या हातात दगड नव्हते, तर संविधानाचा विश्वास होता. पण हा विश्वास जर सत्ताधाऱ्यांनी तोडला, तर उद्याचा उद्रेक कोण थांबवणार? याचा विचार भाजप आणि RSS ने करावा.

परराष्ट्र धोरणावरही मोठे प्रश्न या जनआक्रोश मोर्चात उपस्थित करण्यात आले. भाजपची अमेरिकेकडे झुकणारी भूमिका आणि इराण, रशिया सारख्या जुन्या मित्रदेशांशी वाढत चाललेले अंतर हा केवळ धोरणात्मक बदल नाही, तर ते भारताच्या स्वायत्ततेवर उपस्थित झालेले प्रश्नचिन्ह आहे. “स्वतंत्र परराष्ट्र धोरण” ही भारताची ओळख होती; ती कुठे हरवत चालली आहे?

आज गरज आहे ती एकजुटीची. काँग्रेस असो, डावे पक्ष असोत किंवा इतर लोकशाहीवादी शक्ती…या सर्वांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला पाहिजे. कारण, लढाई आता केवळ सत्तेची नाही, तर संविधान वाचवण्याची आहे. जर दिल्लीत लाखोंचा जनसागर उभा राहिला, तर सत्तेचा अहंकार क्षणात कोसळेल असाच देशाचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे, हा लढा कोणत्याही धर्माविरुद्ध नाही, तर एका विचारसरणीविरुद्ध आहे. सत्ताधाऱ्यांना खरी भीती विचारांची आहे, जनतेच्या एकजुटीची आहे.

लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसते. ती जिवंत राहते प्रश्नांमधून, आंदोलनांमधून आणि सत्तेला दिलेल्या आव्हानांमधून. नागपूरचा मोर्चा हा त्या जिवंत लोकशाहीचा पुरावा आहे. आता पुढचा टप्पा स्पष्ट आहे दिल्लीचा वेढा! जर दिल्लीला वेढा पडला, तर तो केवळ राजकीय बदल घडवणार नाही, तर तो देशाच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहे. सत्तापरिवर्तन घडवणारा ठरणार आहे.

हा देश सर्वसामान्य जनतेचा आहे. जनता मालक आहे. जनता सार्वभौम आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल तर आता जनता म्हणून, देशाचे मालक म्हणून सर्वसामान्य जनतेने ठरवले पाहिजे की, भीतीच्या सावटाखाली गप्प बसायचं, की खंबीरपणे उभं राहून सत्तेला प्रश्न विचारायचे? ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याप्रमाणे प्रश्न विचारण्याची हिंमत जनतेने दाखवली तर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी दिल्लीला वेढा देणे अवघड नाही…त्यासाठी आजपासूनच मोहीम सुरू करा, चलो दिल्ली!


       
Tags: bjpCongressDelhi MarchdemocracyNagpur protestnarendra modiOpposition UnityPolitical ProtestPrakash AmbedkarPublic MovementrssRSS HeadquartersSave ConstitutionVanchit Bahujan Aghadivba
Previous Post

निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

Next Post

‘हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Next Post
'हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

'हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home