Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

mosami kewat by mosami kewat
September 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 
       

– संजीव चांदोरकर 

भारतीय शेयर मार्केट; एक पाय लंगडू लागलेला असताना, दुसरा पाय मात्र जोरात धावू पाहत आहे !

शेयर मार्केट मध्ये पहिल्यांदाच गुंतवणुकी करू लागलेल्या छोट्या / रिटेल गुंतवणूकदारांसाठी काही मित्रत्वाच्या सूचना !

कोणत्याही देशातील शेयर मार्केट दोन पायांवर चालत/ धावत असते. 

एकाला प्रायमरी मार्केट म्हणतात, ज्यात कंपन्या इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) मार्फत कंपनीचे नवीन शेअर्स विक्रीला काढतात आणि शेअर मार्केटवर त्यांचे लिस्टिंग होते. दुसऱ्याला सेकंडरी मार्केट म्हणतात, ज्यावर लिस्टिंग झालेल्या शेअर्सची गुंतवणूकदारांमध्ये खरेदी विक्री होत असते. यात कंपनीला काहीही पैसे मिळत नाहीत हे खरे. पण कंपनीच्या शेअरची किंमत वधारणे हे कंपनीच्या वित्तीय आरोग्यासाठी शुभ लक्षण मानले जाते. 

प्रायमरी मार्केट मध्ये नक्की कधी नवीन शेअर्स विक्रीला काढायचे हे ठरवताना कंपन्या सेकंडरी मार्केट मधील तेजी आणि उत्साह लक्षात घेत असतात. या व अशा अर्थाने तांत्रिक दृष्टया भिन्न असणारी ही मार्केट्स परस्परांवर जैवपणे बांधलेली असतात. 

असे असले तरी भारतीय सेकंडरी मार्केट मध्ये निरुत्साह आहे तर प्रायमरी मार्केट जोरात आहे. 

भारतीय शेयर मार्केटवर भारतीय कंपन्या लिस्टेड असल्या तरी त्या मार्केटच्या सेंटिमेंट वर जागतिक घटनांचा विशेषतः अमेरिकेतील शेयर मार्केटचा निर्णायक प्रभाव पडत असतो.

गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स ७८,५०० वरून ४.५ टक्क्यांनी घसरून काल ७५,००० वर बंद झाला. एकूणच नर्व्हसनेस आहे. त्याला अनेक सयुक्तिक कारणे आहेत. 

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवर आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे खनिज तेलाचे भाव १०० डॉलर वर पोचले आहेत. अमेरिकेत नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुका ट्रम्प यांच्यासाठी जीवन मरणाएवढ्या महत्वाच्या आहेत. त्यांचा डोळा इराणापेक्षा त्या निवडणुकांवर जास्त आहे. निवडणुकीत आपली प्रतिमा विजेत्याची दाखवण्यासाठी ट्रम्प आता नव्याने छेडलेले युद्ध लवकर आटोपते घेतील का याबद्दल शंका वक्त होत आहे. 

दुसऱ्या बाजूला अमेरिकेन शासनाच्या डोक्यावरील कर्जभार ऐतिहासिक उंचीवर पोचला आहे. या व अशा अनेक कारणांमुळे आणि अमेरिकेतील सरकारी रोखे बाजारातील घडामोडीमुळे अमेरिकेतील व्याजदर वाढू शकतात. त्याचा परिणाम शेयर मार्केटवर होणार हा नक्की. तिसऱ्या बाजूला अमेरिकेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्यांचा फुगा फुटेल की फुटणार नाही याच्या चर्चा कधी गरम कधी थंड अशा पद्धतीने होत असतात. 

भारतापुरते बोलायचे तर परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या दहा दिवसात पुन्हा एकदा जोरदार विक्रीला सुरुवात केली आहे. परदेशी भारतीय नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर डॉलर्स मिळाल्यांनतर देखील रुपया फारसा वधारलेला नाही. 

भारतातील आयपिओ मार्केटला मात्र याच दिवसांत उधाण आले आहे. जानेवारी २०२६ पासून ऑगस्ट पर्यंत एकूण १६५ कंपन्यांनी ८०,००० कोटी रुपयांची भांडवल उभारणी केली, ज्यात छोट्या आणि मध्यम कंपन्यांची संख्या लक्षणीय आहे. 

गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे प्रत्येक आयपीओ ओव्हर सबस्क्राईब होत आहे. जुलै ऑगस्ट या दोन महिन्यातील आयपियो जवळपास ६० पटींनी ओव्हर सबस्क्राईब झाले आहेत.

सप्टेंबर ९ रोजी एकाच दिवशी सहा आयपिओ विक्रीसाठी खुले झाले हा एक ऐतिहासिक उच्चांक आहे. सप्टेंबर अखेरीपर्यंत अजून ३० आयपीओ बाजारात येऊ शकतात. डिसेंबर पर्यंत रिलायन्स जिओ, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, फ्लिपकार्ट असे मेगा आयपियो येणार आहेत. सेबीने आधीच मान्यता दिलेल्या किंवा सेबी कडे अर्ज केलेल्या कंपन्या नजीकच्या काळात तुफान भांडवल उभारणी करतील असे अंदाज आहेत. 

देशात गेल्या काही वर्षात नव्याने शेयर मार्केटमध्ये , डायरेक्ट किंवा म्युच्युअल फंडामार्फत, गुंतवणूक करू लागलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यासाठी 

१.  डायरेक्ट शेयर विकत घेण्यापेक्षा म्युच्युअल फंडामार्फत गुंतवणूक करणे कधीही शहाणपणाचे. एका कंपनीच्या शेयर मधील गुंतवणुकीत जोखीम असते. तर म्युच्युअल फंड त्यांचा फंडातून अनेक कंपन्या असणाऱ्या एका पोर्टफोलिओ मध्ये गुंतवणुकी करतात. त्यामुळे जोखीम विखरून जाते. फंडाकडे प्रशिक्षित फंड मॅनेजर्स असतात. ते सतत पोर्टफोलिओ मध्ये बदल करत राहतात. 

२. आयपीओ मध्ये शेयरची किंमत वर्षभरात दुप्पट / त्या पेक्षा जास्त (मल्टी बॅगर ) झाल्याच्या स्टोऱ्या असतात. त्यांची संख्या अत्यल्प असते. उलटपक्षी आयपीओच्या वेळच्या किमतीच्या तुलनेत नंतरच्या काही महिन्यात त्या किमतीपेक्षा खूप कमी किंमत झालेल्या शेयर्सची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आयपीओकडे लवकरात लवकर पैसे मिळवण्याचे साधन म्हणून बघू नका 

३. सर्वात महत्वाचे. शेयरबाजारात पत्त्याचा कॅट पिसावा तसे कंपन्या / शेयर्स पिसले जात असतात. भूतकाळातील परफॉर्मन्स हा काही भविष्यतील परफॉर्मन्सचा द्योतक नसतो. 

४. तुम्हाला भरीला पाडू पाहणाऱ्या ब्रोकर , वित्त सल्लागार , सोशल मीडियावरील लोक यांचे सल्ले फेसव्हॅल्यूवर घेऊ नका. क्रॉसचेक करा. यात तुम्ही ओळखत असणाऱ्या व्यक्ती देखील असू शकतात. 

५  सर्वात महत्वाचे. डाव्या उजव्या कोणत्याही बाजूने बघितले तरी शेयर मार्केट एक जोखीमयुक्त गुंतवणूक आहे. त्यामुळे आपल्या एकूण बचतींपैकी किती प्रमाणात शेयर मार्केटमध्ये जोखीम घ्यायची याची खूणगाठ मनाशी पक्की करा. 

६.  शेवटचे. फक्त जास्त परतावा, रिटर्न मिळवण्याच्या मागे लागू नका. फायनान्स नंतर येते. कॉमन सेन्स, शहाणपण त्यापेक्षा पुरातन आहे. जसे की सगळी अंडी एकाच परडीत न ठेवणे इत्यादी. 


       
Tags: Economicsindian stock marketIPOShare market
Previous Post

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

Next Post

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

Next Post
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर
बातमी

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 1, 2026
0

मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत जनआंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन...

Read moreDetails
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home