Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
       

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनींना धमकावणे, सुविधा उपलब्ध करून न देणे, वैयक्तिक कामे करून घेणे तसेच मानसिक दबाव निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्डन साधना सहाने यांची तत्काळ हकालपट्टी करावी, तसेच मेस कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात यांना निवेदन देण्यात आले. वसतिगृहातील विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीनुसार, रेसिडेन्शियल वॉर्डन असूनही विद्यार्थिनी आजारी पडल्यास किंवा रुग्णालयाशी संबंधित परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक ती जबाबदारी घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भत्ता आणि इतर सुविधांबाबत मागणी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.

मेसच्या जेवणाबाबत विद्यार्थिनींनी तक्रारी केल्यानंतरही त्यावर योग्य ती कार्यवाही होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच वसतिगृहातून काढून टाकण्याची अथवा भत्ता बंद करण्याची धमकी दिली जाते, विद्यार्थिनींवर मानसिक दबाव आणला जातो आणि काही विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक लक्ष्य करून दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच नॉनव्हेज भोजन करणाऱ्या विद्यार्थिनींवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्याशी अपमानास्पद पद्धतीने वागले जाते, तसेच “माझ्याजवळ नको येऊ” अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या : 

– वॉर्डन साधना सहाने यांची तत्काळ हकालपट्टी करावी

– वसतिगृहातील वॉचमनची नियुक्ती व पार्श्वभूमी यांची चौकशी करून चारित्र्य प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींचीच नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

– युनिट क्रमांक चारच्या जेवणामध्ये शिजलेली गोगलगाय आढळल्याचा आरोप करत संबंधित मेस कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करावा

 – वसतिगृहात नियुक्त करण्यात येणाऱ्या वॉर्डनने विद्यार्थिनींना दिले जाणारेच भोजन करणे बंधनकारक करावे

या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी पश्चिम शहर अध्यक्ष राहुल मकासरे, उपाध्यक्ष निलेश बनकर, पवन चव्हाण, रवी मिसाळ, राजेश हिवाळे, भरत नरवडे पाटील, रोहित खरात यांच्यासह शेकडो विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


       
Tags: aurangabadGarKhedGarKhed HostelPoliticalstudentVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

Next Post

हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

Next Post
हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर
बातमी

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 1, 2026
0

मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत जनआंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन...

Read moreDetails
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home