Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
July 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याने त्यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, पीडित कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेनंतर आज ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत आवश्यक मदतीचे आश्वासन दिले. (Moshi Landfill Accident)

Also Read : अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू-चारा लागवडीसाठी देऊ नका; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

या संदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत ‘एक’ (X) सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करत म्हटले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून घनकचरा व्यवस्थापनासारखा महत्त्वाचा विषय दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्याचे हे गंभीर उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड शहरातून दररोज सुमारे १,४०० ते १,५०० टन कचरा जमा होत असल्याचे नमूद करत त्यांनी या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या गॅसचे शास्त्रीय व सुरक्षित व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्तरावर स्वतंत्र पूर्णवेळ विभाग स्थापन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. (Moshi Landfill Accident)

Also Read : जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी

तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राज्य शासनाने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. या प्रकरणातील कॉन्ट्रॅक्टर, महानगरपालिका अधिकारी ज्यांनी कचऱ्या डेपोजवळ बांधकाम परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

दरम्यान, मोशी येथील या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कचरा व्यवस्थापनाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Tags: Dedicated Waste Management DepartmentMaharashtramoshiMoshi Landfill Accidentpimpari chinchwadPrakash AmbedkapuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू-चारा लागवडीसाठी देऊ नका; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबाद मनपा सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी
बातमी

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

by mosami kewat
July 30, 2026
0

औरंगाबाद: औरंगाबाद महानगरपालिकेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या करुणा मेघानंद जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या...

Read moreDetails
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

July 29, 2026
शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 29, 2026
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

July 29, 2026
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home