Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

mosami kewat by mosami kewat
July 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती
       
औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील सुनावणी आज न्यायालयात पार पडली. या प्रकरणात पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय स्वतः नियमावली (गाईडलाईन्स) तयार करून एसआयटीने तपास कशा पद्धतीने पुढे न्यावा, याबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

ॲड. आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (X) सोशल मीडिया खात्यावर याबाबत माहिती देताना सांगितले की, यापूर्वीच्या दोन निर्णयांमध्ये सरकारचे जीआर (शासकीय ठराव) न्यायालयाने अमान्य केले होते. तसेच १२ जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आवश्यक असल्यास स्वतः नियम तयार करण्याचे संकेत दिले होते.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवीन शासकीय ठराव सादर करत या प्रकरणासाठी स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मात्र, या ठरावाला नियमावलीशिवाय कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयासमोर नोंदविण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने याच मुद्द्यावर पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

पुढील सुनावणीत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण न्यायालयाने पुढे कोणत्या पद्धतीने हाताळावे, यासाठी आवश्यक नियमावली तयार केली जाईल. तसेच एसआयटीने तपास कोणत्या दिशेने आणि कोणत्या प्रक्रियेनुसार पुढे न्यावा, याबाबतही न्यायालय मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाकडे या प्रकरणाला दोन वर्षे उलटूनही ठोस प्रगती झालेली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार असून, त्या वेळी न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होण्याची शक्यता आहे.

Tags: aurangabadMaharashtraPoliticalPrakash AmbedkarsitSomnath Suryawanshi Case UpdateVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

Next Post

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

Next Post
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home