Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

mosami kewat by mosami kewat
July 28, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य
       

Commonwealth Games : सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अनेक प्रेरणादायी कामगिरी समोर येत आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे पॅरा-ॲथलेटिक्सपटू शर्मिला धनखड. महिलांच्या F57 गोळाफेक (Shot Put) प्रकारात 9.81 मीटरचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो नोंदवत त्यांनी सुवर्णपदक जिंकत भारताला पॅरा-ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्ण मिळवून दिले. ४० वर्षीय शर्मिलाने ९.८१ मीटर गोळा फेकत हंगामातील सर्वोत्तम (Season Best) कामगिरीसह भारताची २० वर्षांची पॅरा अॅथलेटिक्समध्ये पदकांची प्रतीक्षा संपवली.

याच स्पर्धेत भारताच्या शिल्पा शायला हिने ७.२६ मीटर अंतरावर वैयक्तिक सर्वोत्तम (Personal Best) फेक नोंदवून कांस्यपदकाची कमाई केली. सुरुवातीला शिल्पा चौथ्या स्थानावर होती, परंतु नाट्यमय घडामोडींनंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नायजेरियाच्या युकारिया इयाझी हिची एकमेव वैध फेक फाऊल ठरवण्यात आली. या निर्णयामुळे शिल्पाला थेट कांस्यपदक मिळाले अन् एकाच पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या खात्यात दोन पदकांची ऐतिहासिक नोंद झाली.

कोण आहे शर्मिला धनखड?

शर्मिला धनखड यांचा जन्म 15 ऑगस्ट 1986 रोजी हरियाणातील रेवाडी येथे झाला. मात्र त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. अवघ्या दोन वर्षांच्या असताना त्यांना पोलिओची लागण झाली आणि त्यानंतर आयुष्यभर अपंगत्वाशी झुंज द्यावी लागली. घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. आई दृष्टिहीन असल्याने कुटुंबावर अनेक संकटे होती, तर वडिलांच्या कमाईवरच घराचा गाडा चालत होता.

अवघ्या 18 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. मात्र लग्नानंतर हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण यांचा सामना करावा लागला. अखेर वयाच्या 26 व्या वर्षी पहिल्या पतीने त्यांना दोन मुलींसह घराबाहेर काढले. या कठीण काळात त्यांनी लोकांच्या घरी आया म्हणून काम केले, मुलांची देखभाल करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि पुन्हा नव्याने उभे राहण्याचा निर्धार केला.

वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी अजित सिंग यांच्याशी पुनर्विवाह केला. दुसऱ्या पतीचा मिळालेला भक्कम पाठिंबा त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्यांच्या प्रोत्साहनामुळे शर्मिला पॅरा-ॲथलेटिक्सकडे वळल्या. राव तुलाराम स्टेडियममध्ये माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू टेकचंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण सुरू केले. गोळाफेकीच्या पहिल्याच सरावात त्यांनी 5 मीटरचा थ्रो केला. त्यावेळी राष्ट्रीय विक्रम 6 मीटरचा होता. तेथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकापर्यंत पोहोचला.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर शर्मिला धनखड भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “हे पदक मी माझ्या आईला समर्पित करते. तिने आयुष्यभर खूप संघर्ष केला. माझ्या क्षमतेवर ज्यांनी शंका घेतली, त्यांना हेच माझे उत्तर आहे.” त्यांनी आपल्या दिवंगत वडिलांची आठवण काढत सांगितले की, “एशियन गेम्सपूर्वी वडिलांचे निधन झाले. हा विजय त्यांनाही समर्पित आहे.”


       
Tags: championship 2026Commonwealth GamesCommonwealth Games 2026Gold MedalistSharmila dhankhadShilpa shailasports
Previous Post

औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

Next Post

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

Next Post
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home