Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

mosami kewat by mosami kewat
July 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प
       
देहराडून : उत्तराखंडमधील देहराडून येथे नंदा की चौकी परिसरात सुमारे १६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या पुलाच्या जोडरस्त्याचा मोठा भाग मुसळधार पावसामुळे खचला आहे. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अवघ्या १६ दिवसांतच ही घटना घडल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलाला जोडणारा रस्ता अचानक खचून मोठा खड्डा निर्माण झाला. त्यामुळे हा पूल देहराडून–पाँटा साहिब राष्ट्रीय महामार्गापासून पूर्णपणे तुटला आणि वाहतूक बंद करावी लागली. या पुलाचे उद्घाटन १२ जुलै रोजी करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये याच ठिकाणचा जुना पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी नव्या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते.

दरम्यान, रस्ता खचल्यामुळे देहराडून, विकासनगर आणि शेजारील हिमाचल प्रदेश यांदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून वाहने झाझरा मार्गे वळवण्यात आली आहेत. या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला असून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पुलाचा जोडरस्ता इतक्या कमी कालावधीत खचल्याने सार्वजनिक निधीचा वापर, बांधकामाचा दर्जा आणि देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Tags: DehradunDehradun Bridge Link Road CollapsesRoad collapsedUttrakhand
Previous Post

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

Next Post

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home