Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
       
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील बौद्ध वस्तीमध्ये झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी, दक्षिण सोलापूरच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणी आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामीण सोलापूरच्या उपपोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. शेटफळ येथील मागासवर्गीय बौद्ध वस्तीत काही व्यक्तींनी घरात घुसून वृद्ध महिला-पुरुष तसेच लहान मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

तसेच घरातील संसारोपयोगी वस्तू, धान्य, भांडी, कपडे आणि फर्निचरची तोडफोड करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देवाला हार-फुले घालण्याच्या कारणावरून सुमारे ३०० जणांनी बौद्ध वस्तीवर सामूहिक हल्ला करून दहशत निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर ॲट्रॉसिटी कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल करावेत. तसेच जखमी व बाधित कुटुंबांना शासन नियमानुसार आर्थिक मदत आणि संरक्षण द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

Tags: ActActrocityMaharashtraPoliticalsolapurVanchit Bahujan Aghadi
Previous Post

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील बौद्ध वस्तीमध्ये झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी, दक्षिण सोलापूरच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला....

Read moreDetails
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home