Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वैदिक परंपरा विषमतावादी, तर संतांची परंपरा बंधुत्वाची -ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 25, 2023
in बातमी
0
वैदिक परंपरा विषमतावादी, तर संतांची परंपरा बंधुत्वाची -ॲड. प्रकाश आंबेडकर
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संविधान निर्धार सभेतून वैदिक धर्मावर हल्ला !

मुंबई: एका बाजूला इथे वैदिक परंपरा आहे ती विषमतावादी आहे आणि दुसऱ्या बाजूला संतांची परंपरा आहे ती बंधू भावाची असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या संविधान निर्धार सभेत केले.

अशोक चक्रासोबतचा तिरंगा मान्य करणे. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मान्य करणे. आणि भारतीय राज्यघटनेला मान्य करणे. अशा तीन अटी सरदार पटेल यांनी आरएसएसला घातल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, आरएसएसने १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा केला, पण १५ ऑगस्ट हा दिवस साजरा केला नाही. आरएसएस राज्यघटना मानत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्हाला संधी मिळाली की आम्ही राज्यघटना बदलू असे आरएसएसने त्यावेळी जाहीर केल्याचा इतिहास त्य़ांनी सांगितला.

कोणतीच व्यवस्था हवेतून येत नाही. ती समाजातचं रुजेलेली असते. ज्या व्यवस्थेतून एक नवीन जीवन मार्ग सुरू झाला त्या व्यवस्थेचे नाव संविधान आहे. ७० वर्षानंतर जर आपल्याला संविधान निर्धार सभा घ्यावी लागतं असेल तर, याचा अर्थ असा की, हे संविधान अजून समाजात रुजले नसल्याची खंत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

आपलं चुकलं कुठे ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी म्हटले की, एकेकाळी एका उच्च पातळीवर असणारी समाजवादी आणि मार्क्सवादी विचारधारा, आत्ताच्या नव्या पिढीला आकर्षित करू शकलेली नाही. तिथेच आपली गाडी चुकलेली आहे. इथे एक नवा संघर्ष उभा राहत आहे. आपण म्हणतोय की, आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत, दुसरीकडे संविधान बदलू पाहणारे आहेत. या नव्या संघर्षाला तोंड द्यायचं असेल तर, संविधानाची चर्चा करत असताना धर्माची चिकित्सा देखील करावी लागेल. याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

धर्माची चिकित्सा ही पँथर स्टाईल न करता, वैचारिक आणि तात्विक चर्चा यावर व्हायला हवी असे मत त्यांनी यावेळी मांडले. एकीकडे विषमतावादी व्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत तर, दुसरीकडे समतावादी व्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत. लोकांनी कुठे जायला पाहिजे ते आता ठरवले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.

समतेवर आधारित व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. भाजप आणि आरएसएसला जर दोन तृतीयांश बहुमत मिळाले, तर ही व्यवस्था ते बदलण्याची शक्यता आहे. आपण निर्माण केलेल्या व्यवस्थेवरील हल्ला थांबवायचा असेल तर, ते दोन तृतीयांश बहुमत मिळवणार नाहीत याची दक्षता घ्यायला हवी. यासाठी चार राज्ये महत्वाची आहेत प. बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मोदींनी कुटुंब की चळवळ अशी व्यवस्था निर्माण केली आहे. आपण चळवळ म्हटल की, कुटुंब जेल मध्ये जाईल आणि आपण कुटुंब म्हटल तर चळवळीचा बळी जाईल. अशा परिस्थितीत आपल्याला वेगळी यंत्रणा उभी करून सामान्य माणसांना मार्गदर्शन करावं लागेल. असा सल्ला त्यांनी यावेळी चळवळीतील कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी, डॉ. बाबा आढाव, आमदार शिरिष चौधरी, आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.


       
Tags: mumbaiPrakash Ambedkarrashtr seva dalsanvidhan nirdhar sabhaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आदिवासींच्या घरात बाहेरच्यांना बसवून त्यांचे शोषण करण्याचा नरेंद्र मोदींचा डाव;ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका !

Next Post

इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर काय बोलले ?

Next Post
इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर काय बोलले ?

इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर काय बोलले ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन
बातमी

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

by mosami kewat
August 16, 2026
0

मुंबई : घाटकोपर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी...

Read moreDetails
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 16, 2026
अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

August 16, 2026
कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

August 16, 2026
कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

August 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home