Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

mosami kewat by mosami kewat
August 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!
       

दोन वर्षांपासून मीटरअभावी बंद असलेली पथदिव्यांची व्यवस्था सुरू; कावड यात्रेपूर्वी शिवभक्तांना मोठा दिलासा

अकोला : श्रावण महिना आणि कावड यात्रा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर अकोला ते अकोट राष्ट्रीय महामार्गावरील हनुमान चौक ते तीन खांबे या कावड मार्गावरील पथदिव्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोल व दिवे बसवूनही केवळ वीज मीटरअभावी बंद असलेली प्रकाश व्यवस्था आता सुरू झाली असून संपूर्ण मार्ग रात्रीच्या वेळी प्रकाशमान झाला आहे. या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश रामकृष्ण देव यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.

कावड यात्रेदरम्यान अकोला शहरातून हजारो शिवभक्त पायी कावड घेऊन अकोटकडे जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पथदिवे सुरू असणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, दुभाजकातील पोल उभे करून दिवे बसविण्यात आल्यानंतरही वीज मीटर उपलब्ध नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून ही व्यवस्था बंद होती.

हा प्रश्न लक्षात घेऊन निलेश देव यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, अकोला महानगरपालिका, महावितरण तसेच जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. “कावड यात्रेपूर्वी पथदिवे सुरू झाले पाहिजेत; अन्यथा आंदोलन करू,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला होता.

या पाठपुराव्याची दखल घेत संबंधित यंत्रणांनी कार्यवाहीला गती दिली. अखेर वीज मीटर बसविण्यात आले असून विद्युत जोडणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हनुमान चौक ते तीन खांबे या मार्गावरील पथदिवे प्रत्यक्ष सुरू झाले आहेत.

दरम्यान, या मार्गावरील पथदिव्यांचे काम यापूर्वीच पूर्ण झाले होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दि. ७ जुलै २०२५ रोजी दिलेल्या पत्रात काम पूर्ण झाल्याचे नमूद केले होते. मात्र, प्रत्यक्ष विद्युत पुरवठा सुरू न झाल्याने तयार झालेली सुविधा वापरात येत नव्हती. अखेर मीटरचा प्रश्न निकाली निघाल्याने दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकाश व्यवस्था आता नागरिकांच्या सेवेत आली आहे.

शिवभक्तांकडून प्रशासनाचे आभार

कावड यात्रेपूर्वीच मार्गावरील पथदिवे सुरू झाल्याने शिवभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अकोला महानगरपालिका, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शिवभक्तांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच हा प्रश्न सातत्याने लावून धरून प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे नगरसेवक निलेश देव यांचेही शिवभक्तांनी आभार मानले आहेत.

“शिवभक्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने हा विषय सातत्याने मांडला. केवळ मीटरअभावी दोन वर्षांपासून बंद असलेली प्रकाश व्यवस्था अखेर सुरू झाली, याचे समाधान आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सर्व संबंधितांचे आभार. कावड यात्रेकरूंचा प्रवास आता अधिक सुरक्षित होईल,” अशी प्रतिक्रिया निलेश देव यांनी व्यक्त केली. कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर पथदिवे सुरू झाल्याने “दोन वर्षांचा अंधार दूर झाला; शिवभक्तांच्या कावड मार्गावर अखेर प्रकाश आला,” अशी भावना नागरिक व शिवभक्तांकडून व्यक्त होत आहे.


       
Tags: AkolaKawadKawad Route Lights UpMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

लोकांचा, लोकांसाठी लिहिणारा गायक- कवी: वामनदादा

Next Post

कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

Next Post
कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे 'ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा'चे अनावरण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home