Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

mosami kewat by mosami kewat
August 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण
       
मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कांदिवली-लोखंडवाला येथील क्रांती नगर रिक्षा स्टँडजवळ ज्येष्ठ नागरिक व नाका कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण करण्यात आले. वंचित बहुजन युवा आघाडी आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.

ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी तसेच नाका कामगारांना विश्रांती व संवादासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा कट्टा उभारण्यात आला आहे. या उपक्रमामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नाका कामगारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

या अनावरण कार्यक्रमाला जिल्हा पदाधिकारी सुधाकर सोनोने, विजय लांडगे, संघपाल कोळे, वॉर्ड क्रमांक २६ चे समन्वयक चेतन गायकवाड, वॉर्ड क्रमांक २८ चे समन्वयक संतोष मंडलिक, दीपक खैरे, योगेश गमरे, अविनाश जाधव, आशिष मोहोड, वॉर्ड क्रमांक ३९ चे गणेश नवगिरे, अजेश डोके, माजी वॉर्ड क्रमांक ३९ कमिटीचे साहेबराव तायडे, राजू कुटे, किरण मोरे, रामा अंभोरे तसेच समता सैनिक दलाचे गोविंद पिल्ले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नाका कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव तथा प्रभाग समन्वयक ३९ अभिषेक वाकोडे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला.

Tags: KandivaliLokhandwalaMaharashtramumbaiPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

Next Post

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

Next Post
अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home