Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

mosami kewat by mosami kewat
August 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन
       
मुंबई : घाटकोपर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चिराग नगर येथे भूस्खलनाची भीषण दुर्घटना घडली होती.

या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याने त्यांनी दुःख व्यक्त करत ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे सांगितले.

महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे झालेल्या गंभीर दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने तातडीने जबाबदारी निश्चित करून ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्नेहल सोहनी यांनी केली.

यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दुःखाच्या या कठीण प्रसंगी वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शासन व प्रशासनाकडून पीडित कुटुंबीयांना योग्य ती मदत आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी युवा आघाडीचे सुनील गायकवाड, प्रभाग समन्वयक साक्षी वाघमारे, दिलीप वाघ, कपिल कांबळे आदी उपस्थित होते.

Tags: Ghatkopar landslideLandslideMaharashtramumbaiPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

Next Post

कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home