Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

mosami kewat by mosami kewat
June 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

       

मुंबई : वंचित बहुजन आघाडी (मुंबई प्रदेश) तर्फे दादर-माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ अंतर्गत पहिल्या ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. समाजातील शोषित-वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या तसेच विविध क्षेjत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महमानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली. यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर, मुंबई प्रदेश महिलाध्यक्षा स्नेहल सोहनी, मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, युवा अध्यक्ष सागर गवई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यंदाच्या पुरस्काराने शिक्षणतज्ज्ञ राजू केंद्रे, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग सुवर्णपदक विजेत्या सरिता कदम, पर्यावरणवादी प्रकाश भोईर, ‘जागल्या भारत’चे मुख्य संपादक मिलिंद धुमाळे, सिनेदिग्दर्शक किशोर बेळेकर, भारतातील पहिल्या तृतीयपंथी फोटोजर्नलिस्ट जोया लोबो, समाजसेवक सुमेध जाधव, उद्योजक गौरव सोमवंशी, विद्रोही कवी नितीन चंदनशिवे, लोकगायक साजन बेंद्रे, अभिनेता गौरव मोरे आणि समाजसेविका उमाताई जाधव यांचा गौरव करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना मान्यवरांनी आपल्या कार्याचा प्रवास आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त केली. राजू केंद्रे यांनी वंचित समाजातून जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविण्याचा संकल्प व्यक्त केला. सरिता कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही खेळातील वाटचाल कायम ठेवत ग्रामीण भागात नवे खेळाडू घडविण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. प्रकाश भोईर यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली.

पत्रकार मिलिंद धुमाळे यांनी माध्यम स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त करत हा पुरस्कार शहीद पत्रकारांना समर्पित केला. दिग्दर्शक किशोर बेळेकर यांनी सामाजिक वास्तव मांडणाऱ्या चित्रपटांवर भर देण्याची भूमिका मांडली. जोया लोबो यांनी तृतीयपंथीय समाजाच्या सन्मान आणि प्रतिनिधित्वाच्या प्रश्नांवर भाष्य केले.

सुमेध जाधव यांनी हा सन्मान सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना समर्पित केला, तर गौरव सोमवंशी यांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना उद्योजकतेची प्रेरणा म्हटले. नितीन चंदनशिवे यांनी आपल्या कवितेतून संविधान, समता आणि आंबेडकरवादी विचारांचा संदेश दिला.

समारोप प्रसंगी सुजात आंबेडकर म्हणाले की, आंबेडकरवादी विचारांशी तडजोड न करता शिक्षण, तंत्रज्ञान, कला आणि विविध क्षेत्रांत बहुजन समाजाने मोठी प्रगती केली आहे. या यशाचा उत्सव साजरा करणे तितकेच महत्त्वाचे असून पुढील वर्षीचा जलसा अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात येईल.

प्रास्ताविकात स्नेहल सोहनी यांनी ‘VBA सन्मान पुरस्कार’ हा केवळ पुरस्कार नसून वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांतून संघर्ष करून पुढे आलेल्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव असल्याचे सांगितले. ‘जय भीम, जय संविधान, जय भारत’च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.


       
Tags: JalsaMaharashtramumbaiPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

बीडमध्ये मातंग तरुणाच्या हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीची पीडित कुटुंबाला भेट; अन्य आरोपींना सहआरोपी करण्याची मागणी

Next Post

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Next Post
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना इशारा

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन
बातमी

खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन

by mosami kewat
September 18, 2026
0

नांदेड : खोब्रागडे नगर येथील अल्पवयीन पीडित बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला पोलीस...

Read moreDetails
विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

September 18, 2026
जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

September 18, 2026
संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

September 18, 2026
मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

September 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home