Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

परभणी प्रकरण : पोलीस कोठडीत टॉर्चर प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी!

mosami kewat by mosami kewat
August 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
परभणी प्रकरण : पोलीस कोठडीत टॉर्चर प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी!
       

तपास अहवालातील त्रुटींवर लेखी हरकती!

मुंबई : परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणी बौद्ध समाजातील भगिनी वच्छलाबाई भगवान मानवते यांना दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक करून पोलिस ठाण्यात अमानवीय छळ (Custodial Torture) करण्यात आल्याच्या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगात दाखल तक्रारीवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने या सुनावणीत तक्रारदाराच्या वतीने अॅड. हितेंद्र गांधी, ॲड. संदेश मोरे, ॲड. डॉ. बाबासाहेब जाधव, ॲड. अजय गायकवाड, ॲड. आकाश साळवे आणि योगेश परमार यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

या प्रकरणात सुरुवातीला संबंधित पोलिस विभागाने आयोगाकडे अहवाल सादर केला होता. मात्र, तक्रारदाराच्या वतीने त्या अहवालाला ठाम विरोध करण्यात आला. प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकारी हेच या प्रकरणातील आरोपी असल्याने त्यांनी सादर केलेला अहवाल निष्पक्ष, विश्वासार्ह व ग्राह्य धरता येणार नाही, अशी भूमिका आयोगासमोर मांडण्यात आली. त्यामुळे राज्य मानवी हक्क आयोगाच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन विभागामार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष पुनर्तपास करून नवीन अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीची दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने ३० मार्च २०२६ रोजी एक सदस्यीय समिती नियुक्त करून प्रकरणाचा पुनर्तपास करण्याचे आदेश दिले. समितीने चौकशी करून आयोगाकडे अहवाल सादर केला. मात्र, या अहवालामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे तसेच तपासात गंभीर त्रुटी आणि विसंगती असल्याचे तक्रारदाराच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले.

आजच्या सुनावणीदरम्यान समितीने सादर केलेल्या तपास अहवालाविरोधात सविस्तर लेखी हरकत आयोगाकडे दाखल करण्यात आली. या लेखी निवेदनात तपासातील त्रुटी, अपूर्णता, दुर्लक्षित पुरावे आणि प्रक्रियात्मक चुका यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर निकषांनुसार पुनर्विचार करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या प्रकरणातील आजची सुनावणी महत्त्वपूर्ण ठरली असून, आयोगाकडून या लेखी हरकतींचा विचार करून न्याय्य निर्णय दिला जाईल, अशी अपेक्षा तक्रारदाराच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

याच प्रकरणातील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठीची लढाई राज्य मानवी हक्क आयोगात सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही लढाई लढली जात आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या लीगल सेलचे ॲड. संदेश मोरे, ॲड. हितेंद्र गांधी, ॲड. डॉ. बाबासाहेब जाधव, ॲड. अजय गायकवाड, ॲड. आकाश साळवे आणि योगेश परमार उपस्थित होते.


       
Tags: Human RightsMaharashtraparbhaniParbhani Custodial Torture CasePolitical
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post

डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे

Next Post
डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे

डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारतीय बौद्ध महासभेच्या राज्यस्तरीय बैठकीत धम्मप्रसार व संघटना विस्ताराचा निर्धार; डॉ. भीमराव आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती
बातमी

भारतीय बौद्ध महासभेच्या राज्यस्तरीय बैठकीत धम्मप्रसार व संघटना विस्ताराचा निर्धार; डॉ. भीमराव आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

by mosami kewat
August 26, 2026
0

मुंबई : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब...

Read moreDetails
संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दलित, आदिवासी व वंचितांच्या हक्कांसाठी ठोस कायदेशीर उपायांची मागणी

संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दलित, आदिवासी व वंचितांच्या हक्कांसाठी ठोस कायदेशीर उपायांची मागणी

August 26, 2026
चंद्रपूर: जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

चंद्रपूर: जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 26, 2026
नवी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा दणका; कामाला सुरुवात!

नवी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा दणका; कामाला सुरुवात!

August 26, 2026
मुंबईत घुमणार 'संविधान सन्मान महासभे'चा आवाज!

मुंबईत घुमणार ‘संविधान सन्मान महासभे’चा आवाज!

August 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home