Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बीडमध्ये मातंग तरुणाच्या हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीची पीडित कुटुंबाला भेट; अन्य आरोपींना सहआरोपी करण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
June 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बीडमध्ये मातंग तरुणाच्या हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीची पीडित कुटुंबाला भेट; अन्य आरोपींना सहआरोपी करण्याची मागणी
       

बीड : बीड येथील उमेश दळवी या मातंग समाजातील तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने पीडित दळवी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. तसेच न्यायासाठी ठामपणे लढा देण्याची भूमिका जाहीर केली आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या निर्देशानुसार पक्षाच्या शिष्टमंडळाने दळवी कुटुंबाची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश दळवी (रा. बीड) यांचा 24 मे 2026 रोजी तरुणाला बांधून अमानुष मारहाण करत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून समाजातील विविध स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.

पीडित कुटुंबीयांनी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाला सांगितले की, पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली नाही. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. सध्या केवळ एका आरोपीचे नाव गुन्ह्यात नमूद करण्यात आले असून, शून्या शेख, पिल्लू शेख आणि पठाण शेरखान सत्तार यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी कुटुंबाची मागणी आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दळवी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. उर्वरित आरोपींना सहआरोपी करण्यासाठी तसेच तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या शिष्टमंडळात सम्यकचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोराडे, युवा जिल्हाध्यक्ष अनुरथ वीर, माजी तालुकाध्यक्ष किरण वाघमारे, गौतम बर्फे, धम्मपाल धूळधुळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे.


       
Tags: Beed Murder CaseMaharashtramurderPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्या तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Next Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

Next Post
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home