Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद : बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांसाठी NLM आणि मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना तात्काळ सुरू करा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
August 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबाद : बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांसाठी NLM आणि मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना तात्काळ सुरू करा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
       
औरंगाबाद : राज्यातील बेरोजगार तरुण, महिला, अनुसूचित जाती-जमाती (SC/ST), इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) तसेच शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध स्वावलंबन योजनांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाने गेल्या काही वर्षांत अनेक रोजगाराभिमुख व स्वयंरोजगाराच्या योजना जाहीर केल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवल्या जात नसल्याने बेरोजगार तरुणांना त्याचा लाभ मिळत नाही. परिणामी बेरोजगारी आणि नैराश्याचे प्रमाण वाढत आहे.

मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली नॅशनल लाइव्हस्टॉक मिशन (NLM) योजना गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याचा आरोप करत, गाय, म्हैस व शेळीपालनासाठी देण्यात येणारी ५० टक्के अनुदानाची योजना तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेली मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना अद्याप महाडीबीटी पोर्टलवर सुरू झालेली नसल्याने ऑनलाइन अर्ज करता येत नाहीत. ही योजना केवळ घोषणेतच न राहता तातडीने सुरू करून पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच स्टार्टअप कर्ज योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतच्या व्याजमुक्त कर्जाची घोषणा झाली असली तरी राष्ट्रीयकृत बँका कर्ज मंजूर करत नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत सर्व बँकांना आवश्यक निर्देश देण्याची मागणी करण्यात आली.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत १५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी अनुदान व कर्ज योजना तातडीने सुरू कराव्यात, तसेच जिल्हा उद्योग केंद्र आणि राष्ट्रीयकृत बँकांना स्टार्टअप व स्वयंरोजगारासाठी कर्ज मंजूर करण्याबाबत सक्त आदेश देण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली. या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा. मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष (मध्य) मिलिंद पुंडलिक बोर्डे, महासचिव भगवान खिल्लारे, महासचिव आनंद शेजुळ, संघटक दामोदर दाभाडे, उपाध्यक्ष प्रकाश दाभाडे, सचिव राहुल गायकवाड, अशोक गवळी, राहुल वोलदेडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: aurangabadMaharashtraNLMPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले?

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home