Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

mosami kewat by mosami kewat
September 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 
       
भिवंडी : भाजपकडून महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या नावाने राजकीय घोषणांचा डंका पिटला जात असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून समोर आलेल्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. भाजप माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलविरोधात एका २२ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने दारू पाजल्याचा आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पतीसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या नावाखाली माजी आमदार नरेंद्र पवारने तिला आपल्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांनी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील खासगी मालमत्तेवर नेल्याचा आरोप तिने केला आहे. तेथे शस्त्राचा धाक दाखवून तिला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. 

 घटनेनंतर पीडित महिलेने पडघा पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून नरेंद्र पवार आणि शैलेश पाटीलविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पीडित महिलेने या प्रकरणात न्यायाची मागणी केली आहे. संबंधित आरोपींनी अशाच पद्धतीने आणखी किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असेल, असा सवाल करत तिने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Tags: BhiwandiBhiwandi Gang Rape CasebjpCrime newsKalyan Crime NewsLadki Bahin Scheme MaharashtraMaharashtraMla Narendra PawarmumbaiMumbai CrimePolitical
Previous Post

मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

Next Post

जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home