Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

mosami kewat by mosami kewat
September 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न
       
विरार : वंचित बहुजन आघाडी वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ४९ व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्री आठ वाजता विरार (पूर्व) येथील मनवेलपाडा, कारगील नगर स्थित वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडला.

कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आणि सामाजिक योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे विरार शहर अध्यक्ष सुनील बेडे गुरुजी, सेक्रेटरी बाळा मोहिते गुरुजी, वंचित बहुजन आघाडी वसई-विरार शहर सल्लागार दिलीप साळुंके, महासचिव मिलिंद कांबळे आणि उपाध्यक्ष सुविध पवार यांनी आपले विचार मांडले.

या प्रसंगी विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभा विरार शहर खजिनदार सागर मोरे, संस्कार विभाग उपाध्यक्ष जितेंद्र तांबे, शिवसेना उपशहरप्रमुख प्रविण जाधव, आंतरराष्ट्रीय भिम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश चव्हाण, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७०६ चे निलेश गायकवाड, तसेच वंचित बहुजन आघाडी वसई-विरार शहर सचिव दिपक जाधव, विरार शहर उपाध्यक्ष सनी कांबळे, उपाध्यक्ष निखिल तांबे, ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ जाधव आणि बबन कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात हा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला.

Tags: Bhaiyasaheb AmbedkarMaharashtraPoliticalVanchit Bahujan AghadiVirar
Previous Post

जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

Next Post

खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home