Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
April 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       

शहापूर : औंढा तालुक्यातील शिरड शहापूर येथे जवळा बाजार समितीतील कथित भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) दोन तास तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. हिंगोलीचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची आर्थिक लूट, बेकायदेशीर ‘कट्टी’, पेमेंटमध्ये होणारा विलंब, भूखंड घोटाळा, नियमबाह्य नोकरभरती तसेच सीसीआय कापूस खरेदीतील बनावटगिरी याविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनाची तीव्रता वाढताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. यानंतर सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

मुख्य आरोप असे :

– शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत पैसे देणे बंधनकारक असतानाही ७–८ दिवस विलंब

– प्रति पोते २ ते ३०० किलोपर्यंत बेकायदेशीर ‘कट्टी’

– वजन काट्यांमध्ये फेरफार करून शेतकऱ्यांची फसवणूक

– जवळा बाजार समितीत भूखंड वाटपात अनियमितता

– शासन स्थगिती असूनही नोकरभरती प्रक्रियेत गैरप्रकार

– सीसीआय कापूस खरेदीत बनावट ७/१२ उताऱ्यांद्वारे फसवणूक

जिल्हा निबंधक प्रतिनिधी एम. यू. यादव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र, १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

या आंदोलनामुळे काही काळ शिरड शहापूर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे व त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

आंदोलनात अनिल कांबळे, आनंद ढेंबरे, श्यामसुंदर ठोंबरे, यश राठोड, मुंजाजी जोगदंड, अनिकेत गायकवाड, आसिफ रजा, उमेश रावले, केशव शेळके, अनिल टाकणखार, दीपक बेले, रमेश इंगोले, सय्यद रशीद, अजहर चाऊस, सोफियान चाऊस, इसाक बागवान, यशवंत कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी सहभागी झाले होते.


       
Tags: MaharashtraPoliticalprotestVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार
बातमी

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार

by mosami kewat
July 30, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ आज, गुरुवार (३० जुलै) रोजी लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली....

Read moreDetails
औरंगाबाद मनपा सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

July 30, 2026
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

July 29, 2026
शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 29, 2026
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

July 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home