Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Boisar Women Entrepreneurs : पीडित महिला व्यावसायिकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

mosami kewat by mosami kewat
May 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Boisar Women Entrepreneurs : पीडित महिला व्यावसायिकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Boisar Women Entrepreneurs : पीडित महिला व्यावसायिकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

पालघर : बोईसर येथील बेरोजगार संस्था आणि अन्यायग्रस्त पीडित महिला व्यावसायिकांच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

दि. २४ मे २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राच्या महिला अध्यक्षा गीता जाधव, सचिव दिपाली जाधव, वसई तालुका अध्यक्ष रंजीत सोनवणे, तालुका उपाध्यक्ष भरत मोरे तसेच आजीवन सभासद अमोल घाडगे यांनी बोईसर येथे जाऊन अन्यायग्रस्त आणि पीडित महिला व्यावसायिकांची भेट घेतली.

Also Read : उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

यावेळी त्यांनी महिलांचे सांत्वन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना गीताताई जाधव यांनी, “वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पीडित महिलांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही,” असे ठाम आश्वासन दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे पीडित महिला व्यावसायिकांचे मनोधैर्य वाढल्याचे सांगण्यात आले. (Boisar Women Entrepreneurs)

सदर प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला तब्बल १५ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाची किंवा महिलांच्या मागण्यांची कोणतीही दखल घेतलेली नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

त्यामुळे संबंधित महिलांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक उग्र स्वरूपात केले जाईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. (Boisar Women Entrepreneurs)

Also Read : अकोल्यात वाढत्या महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा

तसेच सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी पक्षाचे शिष्टमंडळ पालघर जिल्ह्याचे सीईओ यांची भेट घेऊन महिलांच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर करणार असल्याची माहिती गीता जाधव यांनी दिली. पीडित महिलांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेतल्याबद्दल पालघर जिल्हा अध्यक्ष शिवविलास सोनकांबळे, आम्रपाली संस्थेच्या अध्यक्षा वैजयंतीमाला सोनकांबळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गीता जाधव व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Tags: BoisarBoisar Women EntrepreneursMaharashtraPalghar ProtestVanchit Bahujan AghadiWomen Business
Previous Post

उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

Next Post

४५ अंशाचा पारा अन् महागाईचा जाळ! इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात वंचितचा भव्य बैलगाडी मोर्चा; बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home