Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
August 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा
       
अक्कलकोट : सोलापूर तालुक्यात एकीकडे मोठमोठ्या शिक्षण संस्था उभ्या राहत असताना आणि खाजगी शाळांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

बसवन संगोगी येथील या शाळेत कष्टकरी, शेतकरी, मजूर, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

एकीकडे खाजगी शाळांना विविध सुविधा उपलब्ध होत असताना आणि मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असताना, गोरगरीब कुटुंबांतील मुलांसाठी असलेल्या सरकारी शाळांची अशी दुरवस्था का, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून आढावा न घेता प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांच्या इमारतींची तातडीने पाहणी करून धोकादायक इमारती व आवश्यक दुरुस्तीची कामे निश्चित करावीत, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

“एसी कार्यालयात बसून शिक्षण व्यवस्थेवर उपदेश देण्यापेक्षा संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहावी. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ केला जात असेल, तर वंचित बहुजन आघाडी गप्प बसणार नाही,” असा इशारा संघटनेने दिला आहे.

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची तातडीने पाहणी करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा वंचित बहुजन आघाडी भाग क्रमांक २च्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Tags: akkalkotBasavan Sangogi ZP School NeglectMaharashtraPoliticalZP Schools
Previous Post

पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि पोलीस भरतीतील आरक्षणाची उच्चस्तरीय चौकशी करा : राजेंद्र पातोडे

Next Post

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home