Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
       
अहमदनगर : शहरातील धीरज परदेशी यांच्या निर्घृण हत्येचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेचा आधार घेत समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथाकथित नेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनानुसार, धीरज परदेशी यांच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनाच्या व्यासपीठावरून आमदार अक्षय कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, ह. भ. प. संग्राम भंडारे यांच्यासह इतर वक्त्यांनी चिथावणीखोर व समाजविघातक वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या वक्तव्यांमुळे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, संविधानिक व लोकशाही मूल्यांचा अवमान झाल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले. ‘एक नागरिक, एक मत, एक मूल्य’ या लोकशाहीच्या समानतेच्या तत्त्वांची सार्वजनिक व्यासपीठावरून अवहेलना करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सोशल मीडियावर साध्या कमेंट किंवा पोस्ट करणाऱ्या सामान्य नागरिकांवर तातडीने कारवाई केली जाते; मात्र सार्वजनिक व्यासपीठावर कथितरीत्या प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात प्रशासनाकडून दुहेरी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संविधानाच्या कलम १४ नुसार कायद्यापुढे सर्व समान असताना कोणालाही विशेष वागणूक देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

संविधानाचा अवमान तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्या सर्व संबंधित वक्त्यांवर तात्काळ एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडून न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

हे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सुहास धीवर, अमर निरभवने, संकेत शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ahmadnagarDhiraj Pardeshi MurderPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

Next Post

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

Next Post
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home