Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
       
नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांमुळे शेतकरी व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

पवनचक्की प्रकल्पांमुळे ध्वनीप्रदूषण, धुळीचे प्रदूषण, पर्यावरणीय परिणाम तसेच जड यंत्रसामग्रीच्या वाहतुकीमुळे शेती, पिके आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.

संबंधित गावांमधील पवनचक्की प्रकल्पांची तात्काळ चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व कामांना स्थगिती द्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना योग्य व न्याय्य नुकसानभरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय पवनचक्की कंपन्यांच्या करारांची व परवानग्यांची कायदेशीर तपासणी करावी, प्रकल्पांच्या पर्यावरणीय व सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि निष्पक्ष अहवाल तयार करावा, तसेच तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हास्तरीय विशेष समिती गठित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

भविष्यात कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी संबंधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांची पूर्वसंमती घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. या सर्व प्रश्नांवर प्रशासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करून शेतकरी व ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा; अन्यथा न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या उपोषणात पावबा आखाडे, अजय निकुंभे आणि देवबा पिंपळे सहभागी झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे.

Tags: AgricultureFarmerMaharashtranandurbarPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home