Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

mosami kewat by mosami kewat
September 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
       

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने IIT मुंबईच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते व राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी भेट देत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

यावेळी सुजात आंबेडकर यांनी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर IIT मुंबई प्रशासनाकडून त्यांच्याबाबत कथितरीत्या चुकीची आणि खोटी माहिती प्रसारित करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच, कोणतेही पुरावे नसताना साहिल यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्यांचे चारित्र्यहनन आणि मीडिया ट्रायल झाल्याचे त्यांनी म्हटले.

साहिल वाकोडे यांच्या न्यायासाठी त्यांच्या मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सुजात आंबेडकर यांनी भेट घेऊन आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या लढ्यात आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाने IIT मुंबई प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी साहिल वाकोडे यांच्याबाबत संस्थेकडून चुकीची माहिती देण्यात आली असल्यास त्याबद्दल प्रशासनाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका शिष्टमंडळाने प्रशासनासमोर मांडली.

साहिल वाकोडे यांच्यावर करण्यात आलेल्या ‘चिटिंग’च्या आरोपांबाबतही प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली. साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

या आंदोलनावेळी IIT मुंबई परिसरात विद्यार्थी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी मोठी गर्दी पहायला मिळाली. 

 


       
Tags: IIT BombayMaharashtramumbaiPoliticalSahil wakodeSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

Next Post

दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

Next Post
दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम - राजेंद्र पातोडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home