Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

mosami kewat by mosami kewat
September 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे
       

अकोला : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून सरकारने मोठी मदत करण्याचा आव आणला असला, तरी दुष्काळग्रस्तांच्या हातात प्रत्यक्ष मदत कधी पडणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, चाऱ्याचा प्रश्न आणि ग्रामीण रोजगाराचे संकट गंभीर असताना शासन निर्णय केवळ कागदी मलम पट्टी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी विविध मदतीच्या घोषणा केल्या आहेत. मात्र, नुकसानीच्या नोंदीसाठी छायाचित्रे, ठिकाणाची माहिती आणि पंचनाम्यांची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्याने प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी पुन्हा प्रशासकीय प्रक्रियेच्या फेऱ्यात शेतकऱ्यांना अडकावे लागणार आहे. खूप उशिरा दुष्काळ जाहीर करणे आणि मदत वेळेत न पोहोचवणे ही सरकारची आजवरची कार्यपद्धती राहिली आहे.

हवामानातील बदल आणि अल निनोच्या संभाव्य परिणामांचे संकेत आधीपासून आलेले असतानाही सरकारने पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाहीत. पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान आणि पाण्याची कमतरता वाढत असताना शासन यंत्रणा आधीच सज्ज झाली असती, तर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आणता आली असती. सरकार गंभीर नसल्याने शेतकरी शेतमजूर आणि सामान्य माणूस हवालदिल आहे. एक रुपयात पीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असला, तरी पेरणीचे क्षेत्र आणि विमा उतरवलेल्या क्षेत्रातील तफावत तसेच नुकसान भरपाईच्या दाव्यांच्या प्रक्रियेतील विलंब यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

शेतकऱ्यांकडून विमा घेण्यासाठी सहभाग वाढवला, पण नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळण्यात विलंब होतो. त्याचा फायदा फक्त विमा कंपनीला झाला. शेतकरी मात्र लुटला गेला आहे. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांसोबत ग्रामीण मजुरांसमोरही रोजगाराचे मोठे संकट उभे आहे. अनेक जिल्ह्यांतील मंजूर रोजगार हमीची कामे दीर्घकाळ बंद राहिल्याचा आरोप असून, मजुरांकडून कामे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी करूनही काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यामुळे दुष्काळाच्या काळात रोजगार हमीची कामे बंद राहणे हा केवळ प्रशासकीय प्रश्न नसून, ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेशी संबंधित गंभीर विषय आहे. सरकार रोजगार हमी चे नाव जी रामजी करून खुश आहे.

शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे देखील पालन केले जात नाही. २०१६ मध्ये स्वराज अभियान विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दुष्काळ व्यवस्थापनाबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते. दुष्काळाचे मूल्यांकन करताना केवळ पाणी आणि अन्नधान्याची उपलब्धता पुरेशी नसून स्थलांतर, उपजीविकेचे संकट, आत्महत्या तसेच महिला आणि मुलांची परिस्थिती यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले होते. याच पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीत सरकारने केवळ दुष्काळ जाहीर केला आहे.

पंचनामे, पीकविमा, रोजगार हमी, चारा आणि पाणीपुरवठा या सर्व उपाययोजनांची वेळेत अंमलबजावणी बाबत काहीच ठोस निर्णय नाही.राज्यातील जल जीवन मिशन योजना ७५% टक्के पैसे खर्च करून देखील पाणी देऊ शकत नाहीत. ह्यात सर्व यंत्रणा आणि कंत्राटदार यांनी हात ओले करून घेतले. गावे मात्र तहानलेली आहेत. दुष्काळ हा केवळ घोषणा करण्याचा विषय नाही. शेतकऱ्याच्या हातात मदत पोहोचेपर्यंत सरकारची जबाबदारी संपत नाही. आज दुष्काळ जाहीर झाला आहे; आता पंचनामे, विमा, रोजगार आणि मदतीच्या नावाखाली पुन्हा कागदोपत्री प्रक्रिया सुरू ठेवून चाल ढकल करण्यासाठी हा शासन निर्णय असून त्यात मदत नसून अपयश झाकण्याची धूळफेक आहे, केंद्र सरकारने अद्याप हे निकष आणि दुष्काळ स्वीकारला नाही.

ट्रिगर वन नावाने अंमलबजावणीत दिरंगाई करण्यात येत आहे. दुष्काळग्रस्तांच्या हक्कांसाठी योग्य उपाय योजना आणि निधी मंजूर न केल्यास वंचित बहुजन आघाडी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालया वर गुरे ढोरे कोंबडे बकरे बैलजोडी घेऊन बिऱ्हाड आंदोलन सुरू करेल असा इशाराही राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.


       
Tags: AgricultureAkolaDevendra FadanvisFarmerFarmer crisisMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

Next Post

या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

Next Post
या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन
बातमी

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

by mosami kewat
October 17, 2026
0

अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव–२०२६ च्या निमित्ताने अकोला येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चलो अकोला’, लाखोंची...

Read moreDetails
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home