Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
August 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा
       
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी अनुदानित आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी वंचितचे नागपूर जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी आदिवासी विकास विभाग, नागपूरचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले.

दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री जपतलाई येथील आदिवासी अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्य व सुरक्षेची जबाबदारी शासनाची असताना आश्रमशाळेतील कथित निष्काळजीपणामुळे अशी घटना घडणे गंभीर व निंदनीय असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून चौकशी करावी आणि चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या शालेय अधिकारी, कर्मचारी, वसतिगृह अधीक्षक आणि संस्था संचालक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

मृत्यू झालेल्या प्रत्येक विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना तात्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका वारसाला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी वंचितने केली आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांची तातडीने तपासणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि निवासाच्या सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने १५ दिवसांच्या आत या मागण्यांवर ठोस कार्यवाही केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अजय सहारे यांनी दिला. यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव येवले, आय.टी. सेल प्रमुख शुभम वाहने आणि अनिल नांदूरकर उपस्थित होते.

Tags: GadchiroliJaptlai Ashram SchoolMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home