Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

४५ अंशाचा पारा अन् महागाईचा जाळ! इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात वंचितचा भव्य बैलगाडी मोर्चा; बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष

mosami kewat by mosami kewat
May 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
४५ अंशाचा पारा अन् महागाईचा जाळ! इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात वंचितचा भव्य बैलगाडी मोर्चा; बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष

४५ अंशाचा पारा अन् महागाईचा जाळ! इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात वंचितचा भव्य बैलगाडी मोर्चा; बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष

       

अकोला : पेट्रोल, डिझेल नागरिकांवरील आर्थिक भार वाढत आहे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्य तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, सतत वाढणाऱ्या किमती, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांचे वस्तूंच्या टंचाईविरोधात जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 मे रोजी अकोल्यात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र राज्य सरकार विरुद्ध मोर्चा काढण्यात आला.

ह्या भव्य बैलगाडी मोर्चा मध्ये सायकल, गाढव, घोडे, घोडागाडी, बैलगाडी आणि मोठ्या संख्येत सरकारला महागाई नियंत्रणात आणण्यात अपयश झाले याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात आला. अकोल्यातील 45 डिग्री उन्हात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात आज, २५ मे रोजी अकोला येथे भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात बैलगाड्या, गाढवे, सायकली आणि घोडे यांचा वापर करून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

Also Read : Boisar Women Entrepreneurs : पीडित महिला व्यावसायिकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर, खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचे आंदोलकांनी म्हटले. महागाई नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे सांगत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पाच पदाधिकारी जाऊन जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन देणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडी नेते ह्यांनी घेतली. जिल्हा प्रशासन मोर्चात येऊन निवेदन घ्यावे असा आग्रह धरल्याने निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मोर्चात येऊन निवेदन स्वीकारले. अधिकारी मोर्चाला सामोरे जाऊन निवेदन स्वीकारणे हे पहिल्यांदा घडले. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. बैलगाडी आणि प्राण्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाने शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

Also Read : उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश युवक आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, युवक अध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, महिला आघाडी अध्यक्षा आम्रपाली खंडारे, महासचिव संगीता अढाऊ, नंदकुमार डोंगरे, धीरज इंगळे, सिद्धार्थ देवधरीकर, निलेश देव, मझहर खान, गजानन गवई, दामोदर जगताप,

डॉ. धर्माळ गोरसिंग राठोड, सुनील सरदार, चरण इंगळे, अशोक दारोकार, किशोर जामनीक, पवन बुटे, सुगत डोंगरे, अनुराधा डांगे, राहुल इंगळे, सम्राट तायडे, वैशाली कांबळे , लक्ष्मी वानखडे, अक्षय राऊत, आशिष रायबोले, सुनिता हेरोडे, आकाराम मोरखडे, जिया शहा, विद्या शामस्कर, मिलिंद दामोदर, मंगला शिरसाट सुरेश गवई, नाजूक दारोकार सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: AkolaAkola Bullock Cart MarchBullock Cart ProtestFuel Price HikeMaharashtramarchPoliticalprotestVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

Boisar Women Entrepreneurs : पीडित महिला व्यावसायिकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Next Post

बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!

Next Post
बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!

बोईसर ग्रामपंचायतीच्या 'त्या' कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
July 25, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी (दि. २५) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी NEET...

Read moreDetails
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद

July 24, 2026
येवल्यात मंत्री छगन भुजबळांना वंचित बहुजन युवा आघाडीकडून काळे झेंडे; सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध

येवल्यात मंत्री छगन भुजबळांना वंचित बहुजन युवा आघाडीकडून काळे झेंडे; सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध

July 24, 2026
NEET परीक्षा रद्द करा आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करा! – ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

NEET परीक्षा रद्द करा आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करा! – ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

July 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home