नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आज नांदेड जिल्ह्यातील किरोडी आणि लोहा या पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. संपूर्ण महाराष्ट्रातील पूरग्रस्त गावांना ते भेटी देत असून, याच अंतर्गत त्यांनी नांदेडमधील नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला.
पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर सुजात आंबेडकर यांनी पीडित शेतकरी आणि नागरिकांना वंचित बहुजन आघाडीकडून मदतीचे आश्वासन दिले. “वंचित बहुजन आघाडी शासन स्तरावरून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल,” असे ते या वेळी म्हणाले.
या पाहणी दौऱ्यात सुजात आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवा नारंगले, नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
BMC निवडणूक २०२६: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज आपल्या...
Read moreDetails






