Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

mosami kewat by mosami kewat
March 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!
       
मुंबई : एपस्टीन फाईल प्रकरण, अमेरिकेशी एकतर्फी व्यापार प्रकरण, पंतप्रधान मोदी यांचा   एपस्टिन फाइल्समध्ये उल्लेख यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात २ मार्च २०२६ रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात नियोजित असलेल्या ‘एपस्टिन फाईल्स’ संदर्भातील आंदोलनावरून दादर रेल्वे स्थानक परिसरात मोठा वाद पाहायला मिळाला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पत्रक वाटप करत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र मुंबईकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पोलिसांना अखेर माघार घ्यावी लागली. (Epstein file)

नेमकी घटना काय?

CSMT येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते शनिवारी (दि.२८) सकाळी मुंबईमध्ये दादर स्थानकाबाहेर पत्रके वाटत होते. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीपेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांना पोलिसांकडून होताना दिसणारा त्रास पाहून आजूबाजूचे सामान्य मुंबईकर स्वतःहून पुढे आले आणि पोलिसांना भिडले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आणि सर्वसामान्यांचा संताप पाहून पोलिसांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. 

“हे केवळ एका पक्षाचे आंदोलन राहिलेले नाही, तर हे जनतेचे आंदोलन बनले आहे. हे जनरेट्याचे वादळ आता कोणीही रोखू शकत नाही. दडपशाही करून आवाज दाबता येणार नाही, अशी प्रतिक्रिया वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

पोलिसांच्या या कारवाईनंतर वंचित बहुजन आघाडी आपल्या भूमिकेवर अधिक ठाम झाली आहे. आंदोलन तर होणारच असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून, २ मार्च रोजी होणाऱ्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे सामील असणारा आहेत. यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे नरेंद्र मोदी विरोधात महाआंदोलन होणार आहे.

Tags: DadarMaharashtramumbaiMumbai protestnarendra modiNarendra Modi Epstein filePoliticalPrakash Ambedkarvbaforindia
Previous Post

इराणमध्ये युगांत! अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार; संपूर्ण कुटुंबही संपले

Next Post

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा ; उद्या मुंबईत महाआंदोलन

Next Post
मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा ; उद्या मुंबईत महाआंदोलन

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा ; उद्या मुंबईत महाआंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड
बातमी

कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

by mosami kewat
June 11, 2026
0

कोटा (राजस्थान) : राजस्थानातील कोटा शहरातील न्यू मेडिकल रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीनंतर पाच महिलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात तपासातून गंभीर धक्कादायक बाब...

Read moreDetails
अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?

अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?

June 11, 2026
शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

June 11, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

June 10, 2026
उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

June 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home