Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

इराणमध्ये युगांत! अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार; संपूर्ण कुटुंबही संपले

mosami kewat by mosami kewat
March 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
इराणमध्ये युगांत! अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार; संपूर्ण कुटुंबही संपले
       
तेहरान : पश्चिम आशियातील तणावाने आता भीषण वळण घेतले आहे. जगाला हादरवून टाकणाऱ्या एका कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या करण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या थेट आणि अचूक हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

इराणमधील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी खामेनेई आपल्या कुटुंबासह असताना हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी खामेनेईंच्या हालचालींवर दीर्घकाळ लक्ष ठेवले होते. ज्यावेळी हल्ला झाला, तेव्हा खामेनेईंसोबत त्यांची मुलगी, जावई, सून आणि नातवंडेही उपस्थित होती. दुर्दैवाने या हल्ल्यात कोणीही जिवंत राहिले नाही.

या हल्ल्यात लहान बालकांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले असून, इराणच्या सत्तेचा केंद्रबिंदू असलेला हा वाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे या घटनेची पुष्टी केली. इराणी जनतेला अखेर त्यांचे स्वातंत्र्य मिळाले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रॉयटर्सच्या अहवालानुसार, हल्ल्यानंतर घटनास्थळावरून खामेनेईंचा मृतदेह शोधून काढण्यात आला आणि त्याचे पुरावे ट्रम्प यांना सादर करण्यात आले.

आयातुल्ला अली खामेनेई यांना वारंवार सत्ता सोडण्याचा इशारा दिला जात होता, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अमेरिकेने हे पाऊल उचलले,” असे अमेरिकन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा; युद्धाचा भडका उडणार?

खामेनेईंच्या मृत्यूनंतर संपूर्ण इराणमध्ये शोककळा पसरली असून सरकारने ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मात्र, या दुःखाचे रूपांतर आता आक्रमकतेत होताना दिसत आहे. आम्ही आता शांत बसणार नाही, अमेरिकेला या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा इराणी लष्कराने दिला आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली असून, युद्धाची ठिणगी आता वणव्यात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tags: americaIranIran Israel WarisraelKhamenei
Previous Post

नागपूर हादरले! काटोलमधील ‘SBL’ स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू

Next Post

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

Next Post
मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”
बातमी

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

by mosami kewat
August 14, 2026
0

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दौऱ्यानंतर झालेल्या 'शुद्धीकरणा'च्या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी तीव्र...

Read moreDetails
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026
पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि पोलीस भरतीतील आरक्षणाची उच्चस्तरीय चौकशी करा : राजेंद्र पातोडे

पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि पोलीस भरतीतील आरक्षणाची उच्चस्तरीय चौकशी करा : राजेंद्र पातोडे

August 14, 2026
टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर

टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home