Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Maharashtra Monsoon : राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा; हेक्टरी ५० हजार रु. मदतीची मागणी; प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

mosami kewat by mosami kewat
September 30, 2025
in बातमी
0
राज्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करा; हेक्टरी ५० हजार रु. मदतीची मागणी; प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

राज्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करा; हेक्टरी ५० हजार रु. मदतीची मागणी; प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

       

‎मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता, राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
‎
‎वंचित बहुजन आघाडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात मागणी केली आहे की, अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर जनावरांचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची दिवाळी घरात येणारे पीक वाहून गेल्याने त्यांचे स्वप्नही उद्ध्वस्त झाले असल्याचे नमूद केले आहे.
‎
‎’२२०० कोटींची मदत तुटपुंजी’ –
‎
‎राज्य सरकारने घोषित केलेली २,२०० कोटी रुपयांची मदत ही या अभूतपूर्व संकटाच्या तुलनेत अतिशय तुटपुंजी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) माध्यमातून शेतकऱ्यांकडून करोडो रुपयांचा सेस वसूल केला जातो, तो आणि राज्याच्या सकल उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा १२% वाटा अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मदतीला का येत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, शासनाने ही मदत कोणत्या दराने दिली, हेदेखील स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‎
‎वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या:
‎
‎१.  राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणे.
‎
‎२.  शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देणे.
‎
‎3.  शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी (Loan Waiver) द्यावी.
‎
‎४.  या संकटसमयी सरकारने तातडीने आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
‎
‎उद्योजकांना मदत मग शेतकऱ्यांना ‘पंचनामे’ कशासाठी?

‎मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करताना किंवा त्यांना मदत देताना सरकार कोणतेही सर्व्हे किंवा पंचनामे करत नाही, मग शेतकऱ्यांच्या बाबतीतच हे सोपस्कार का लावले जातात, असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने सरकारला विचारला आहे.
‎
‎”आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नको, तर सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा,” अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.


       
Tags: AgriculturalFarmerMaharashtraMonsoonmumbaiOla DroughtrainVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Nanded : सुजात आंबेडकरांची पूरग्रस्त भागांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला आढावा, दिले मदतीचे आश्वासन

Next Post

Beed : यश ढाका खून प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Next Post
Beed : यश ढाका खून प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Beed : यश ढाका खून प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home