Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून ‘त्रिभाषा सूत्र’ लागू

mosami kewat by mosami kewat
March 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून ‘त्रिभाषा सूत्र’ लागू
       

3 Language Formula : शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय शिक्षण अभ्यासक्रम 2023 च्या शिफारशींनुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्र लागू करणार आहे. इयत्ता 6 वीपासून हे धोरण अमलात येणार असून भाषाशिक्षणाच्या रचनेत मोठा बदल होणार आहे.

या नव्या धोरणातील सर्वात लक्षवेधी बदल म्हणजे इंग्रजी भाषेची सक्ती रद्द करण्यात येणार आहे. इंग्रजी आता अनिवार्य विषय नसेल; ती परकीय भाषांच्या गटात समाविष्ट करण्यात आली असून विद्यार्थ्यांना ती ऐच्छिक स्वरूपात निवडता येणार आहे.

त्रिभाषा सूत्रानुसार तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय असणे बंधनकारक राहील. तिसरी भाषा म्हणून विद्यार्थ्यांना इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन यांसारख्या परकीय भाषांमधून एक पर्याय निवडता येईल. यामुळे विद्यार्थ्यांना विविध भाषांचा परिचय होण्यासोबतच जागतिक पातळीवरील संधींचे दरवाजे खुले होणार आहेत.

इयत्ता 6वी ते 8वी या मधल्या टप्प्यात तिसरी भाषा सुरू करण्यात येईल. या भाषेसाठी अधिक वेळ देण्याची शिफारस करण्यात आली आहे, कारण नवीन भाषा आत्मसात करण्यासाठी अधिक सरावाची गरज असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत तीनही भाषांमध्ये प्रावीण्य मिळवणे शक्य होईल. 9वी आणि 10वीमध्येही तिन्ही भाषा शिकवाव्यात, अशी शिफारस समितीने केली आहे.

दहावीपर्यंत तीन भाषा शिकल्यामुळे विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान मजबूत होईल. याचा फायदा संघ लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना होणार आहे.

संस्कृतीचा व्यापक परिचय

त्रिभाषा सूत्रामुळे विद्यार्थ्यांना विविध भारतीय भाषांबरोबरच त्या त्या भाषांच्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक जीवनाची ओळख होणार आहे. नऊ प्रादेशिक भाषांसाठी नवीन पाठ्यपुस्तके तयार केली जाणार असून त्यामुळे विषय अधिक प्रभावीपणे समजण्यास मदत होईल.

इंग्रजीची सक्ती हटवल्यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. त्यांना इतर भारतीय किंवा परकीय भाषांचा अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ देता येईल. उच्च शिक्षण, नोकरी किंवा व्यावसायिक क्षेत्रात परकीय भाषांचे ज्ञान उपयुक्त ठरणार आहे.

नवीन त्रिभाषा सूत्रामुळे शिक्षण व्यवस्थेत भाषिक विविधतेला प्रोत्साहन मिळणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


       
Tags: 3 Language FormulaCbscEducation
Previous Post

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा ; उद्या मुंबईत महाआंदोलन

Next Post

भारत सरकारने इराण के साथ खडा रेहना चाहीये : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
भारत सरकारने इराण के साथ खडा रेहना चाहीये : ॲड. प्रकाश आंबेडकर

भारत सरकारने इराण के साथ खडा रेहना चाहीये : ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे सुजात आंबेडकर यांची संवाद बैठक
बातमी

शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे सुजात आंबेडकर यांची संवाद बैठक

by mosami kewat
August 11, 2026
0

नांदेड: शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची संवाद बैठक...

Read moreDetails
नांदेड : खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांची भेट; वृक्षारोपण उपक्रम

नांदेड : खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांची भेट; वृक्षारोपण उपक्रम

August 11, 2026
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न; सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांशी थेट संभाषण

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न; सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांशी थेट संभाषण

August 11, 2026
नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

August 11, 2026
लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

August 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home