Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

mosami kewat by mosami kewat
September 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा
       
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदी यांचा वारंवार उल्लेख आपले “परममित्र” (Dear Friend) असा करतात. पण, मग मोदींचे हे परममित्र भारताची धोरणे बदलण्यासाठी भारताला १००% टॅरिफ, निर्बंध आणि आर्थिक दबावाची धमकी वारंवार का देतात? ही कसली मैत्री आहे? असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि इराणला लक्ष्य करणाऱ्या “लिंडसे ओ. ग्रॅहॅम सँक्शनिंग रशिया अँड इराण अ‍ॅक्ट ऑफ २०२६” या व्यापक निर्बंध विधेयकावर स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रूपांतर केले आहे. या कायद्यामुळे रशियन अधिकारी, बँका, ऊर्जा व्यापार आणि त्यांच्या ‘शैडो फ्लीट’वर (गुप्त जहाजांचा ताफा) कडक कारवाई करण्याचे अधिकार अमेरिकन प्रशासनाला मिळाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, रशियाकडून कच्चे तेल व नैसर्गिक वायूची खरेदी सुरू ठेवणाऱ्या भारतासारख्या देशांवर १००% पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) आणि दंडात्मक कारवाई करण्याचे विस्तारित अधिकार ट्रम्प प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. यावरून ॲड. आंबेडकरांनी मोदींना समाजमाध्यमांच्या द्वारे सवाल केले आहेत. 

ॲड. आंबेडकर म्हणाले, मोदींच्या तोंडावर मारलेली ही एक चपराक आहे का? पुन्हा ब्लॅकमेलिंग?

नवी दिल्लीतील ब्रिक्स (BRICS) परिषदेनंतर, जिथे मोदींनी ‘नवी दिल्ली जाहीरनाम्या’त (The New Delhi Declaration) अमेरिकेचे नाव थेट घेणे टाळले आणि इराणावरील हल्ल्यांची जबाबदारी मुद्दाम कोणावरही ढकलली नाही; अशा प्रकारे अमेरिकेचे लाड पुरवून किंवा त्यांचे मन राखून एक मुत्सद्दी समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, या घटनेच्या काही दिवसांतच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींच्या या “मनधरणी”चे उत्तर असे दिले की, रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरू ठेवल्याबद्दल भारतासारख्या देशांवर १००% आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याचे अधिकार देणाऱ्या कायद्यावर त्यांनी स्वाक्षरी केली. अमेरिकेकडे मोदींचे असे कोणते “काळे रहस्य” (Dark Secrets) आहे, ज्याचा वापर करून ते मोदींना धमकावू शकत आहेत? ट्रम्प भारताशी हुकूमशहासारखे का वागत आहेत? मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे का? अमेरिकेला मोदींचे “काळे रहस्य” माहित असल्यामुळे मोदींनी भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेशी तडजोड केली आहे का? असे प्रश्न ॲड. आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.

Tags: Donald TrumpEconomicsMaharashtranarendra modiPoliticalPrakash AmbedkarRussiaTariffVanchit Bahujan Aghadi
Previous Post

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

Next Post

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

Next Post
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home