Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

mosami kewat by mosami kewat
September 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट
       
अहिल्यानगर (श्रीरामपूर): श्रीरामपूर येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आकाश चंद्रशेखर दुबैया ऊर्फ शेखर दुबैया यांची ११ जुलै २०२६ रोजी दुपारी अत्यंत निघृण हत्या करण्यात आली. अवघ्या जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथील ‘हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग’ येथे नशेत आलेल्या आरोपींनी जेवण मिळण्यास उशीर झाल्याचा आरोप करत प्रथम हॉटेलमधील वेटरला शिवीगाळ करत मारहाण केली. हा वाद वाढत असल्याचे पाहून हॉटेल मालक आकाश दुबैया यांनी मध्यस्थी करत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याने चिडलेल्या आरोपींनी आकाश यांच्यावर खुर्ची आणि धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला चढवला. 

या हल्ल्यात आकाश दुबैया यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हे भांडण सोडवण्यासाठी आलेले त्यांचे वडील आणि चुलत भाऊदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

या हत्येप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मुख्य आरोपी सूरज जाधव, यश जाधव आणि ओम डफळ या तिघांना अटक केली आहे. 

या धक्कादायक घटनेनंतर शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. गुन्हेगारांवर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर शहर सलग चार दिवस कडकडीत बंद ठेवले होते.

दरम्यान, अहमदनगर दौऱ्यावर असताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिवंगत आकाश दुबैया यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: ahmadnagarMaharashtraPoliticalShrirampurSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

अमेरिकेचे १०० टक्के अतिरिक्त आयात कर  

Next Post

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home