Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही – प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
October 28, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही - प्रकाश आंबेडकर

निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही - प्रकाश आंबेडकर

परभणी : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाला ओबीसीत (OBC) समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोन वेळा नकार दिला आहे आणि तो निर्णय कायम राहण्याची शक्यता आहे.

मराठा समाजातील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजात ‘निजामी मराठा’ (Nizami Maratha) आणि ‘रयतेचा मराठा’ (Rayatecha Maratha) असे दोन गट आहेत. निजामी मराठे हे निजामाच्या बाजूने राहिलेले, तर रयतेचे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहिलेले आहेत.

सोळाव्या शतकापासूनचा हा संघर्ष आजही सुरू आहे. “सत्तेतील निजामी मराठ्यांमुळे रयतेला न्याय नाही” सत्तेत बसलेला वर्ग हा निजामी मराठ्यांचा असून, त्यांची रयतेतील मराठ्यांना आरक्षण देण्याची मानसिकताच नाही, असा थेट आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला. ते म्हणाले, “जोपर्यंत रयतेतील मराठा हा निजामी मराठ्यांपासून फारकत घेत नाही, तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही.” रयतेतील मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, ते श्रीमंत नाहीत. त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागणीलाही निजामी मराठा वर्ग पाठिंबा देत नाही, असे त्यांनी नमूद केले.

पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

“बदलासाठी मतदारांनी ठरवावे” –

निजामी मराठ्यांच्या हातातून सत्ता रयतेतील मराठ्यांच्या हातात जाईल, या भीतीमुळे सत्तेतील निजामी मराठे रयतेतील मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. “निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय रयतेतील मराठ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

शेवटी अ‍ॅड. आंबेडकर यांनी रयतेच्या मतदारांना आवाहन केले आहे की, “आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की, त्यांना बदल हवा आहे की नाही?”

Tags: MaharashtraparbhaniPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

एल आय सी आणि अदानी समूह

Next Post

संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

Next Post
संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home