Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

mosami kewat by mosami kewat
October 27, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोर्चा संपन्न!

पुणे : महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या कारभाराविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज पुण्यात आयोजित केलेला ‘विराट धडक मोर्चा’ यशस्वी ठरला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात मांडलेल्या झोपडीवासीयांच्या सर्व मागण्या एसआरए प्रशासनाने मान्य केल्या आहेत.

मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद :

एसआरएच्या माध्यमातून सुरू असलेल्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणि झोपडीवासीयांसह सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा ‘विराट धडक मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी पिंपरी चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. महायुती सरकार आणि एसआरएच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेत एस.आर.ए. कार्यालय, पुणे येथे समारोप झाला.

एसआरएच्या कामातील अनियमितता आणि बिल्डरधार्जिण्या भूमिकेमुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. या आंदोलनामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात लक्ष वेधले गेले होते.

एसआरए गैरकारभाराविरोधात पुण्यात जनआंदोलन; प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चातील कार्यकर्त्यांकडून रुग्णवाहिकेला तात्काळ मार्ग

एसआरए प्रशासनाने मान्य केलेल्या प्रमुख मागण्या :

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एसआरए कार्यालयासमोर नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी पुढील मागण्या जोरदारपणे मांडल्या, ज्या प्रशासनाने तातडीने मान्य केल्या.

१)  पिंपरी-चिंचवडमधील जे प्रकल्प पाच वर्षांपासून रखडलेले आहेत, त्यांना एसआरएचे (SRA) नियम त्वरित लागू करण्यात यावेत.

२) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एसआरए प्रकल्पग्रस्तांना दरमहा पंधरा हजार रुपये घरभाडे देण्यात यावे.

३)  चुकीच्या धोरणांमुळे नागरिकांना अपात्र ठरवण्याचे काम तातडीने थांबवावे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व मागण्या मांडल्यानंतर एसआरए प्रशासनाने त्या मान्य केल्यामुळे, वंचित बहुजन आघाडीचा एसआरए विरोधातील विराट धडक मोर्चा यशस्वी झाला. यामुळे झोपडीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड मधील SRA बाधित लोकांनी ॲड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले आहेत.

Tags: HousingRightsMaharashtraPimpriChinchwadPrakash AmbedkarprotestPublicMovementpuneshivaji nagarSocialJusticeSRAProtestVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

घाटकोपरमध्ये RSS च्या पथसंचलनावरून नवा वाद; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना प्रश्न

Next Post

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणी (उत्तर) तर्फे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न‎‎

Next Post
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणी (उत्तर) तर्फे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न‎‎

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणी (उत्तर) तर्फे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न‎‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home