Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नायगाव: ४२ वर्षे उलटूनही पात्र लाभार्थी निवासापासून वंचित; १० दिवसांत प्लॉट वाटप न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
August 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नायगाव: ४२ वर्षे उलटूनही पात्र लाभार्थी निवासापासून वंचित; १० दिवसांत प्लॉट वाटप न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
       
नांदेड : मौजे नरंगल, ता. नायगाव, जि. नांदेड येथील १९८४ पासून प्रलंबित असलेले प्लॉट वाटप तातडीने करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सन १९८४ मध्ये पुनर्वसन वस्तीवाढ गावठाण योजनेअंतर्गत गावातील नागरिकांच्या निवासासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. या जमिनीचे गट/सर्वे क्रमांक ४/१, ४/८, ४/९ आणि २० असून, संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून संपादित जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. जमीन संपादनानंतर संबंधित ७/१२ उताऱ्यावर शासनाचे नाव नोंदविण्यात आले. मात्र, तब्बल ४२ वर्षे उलटूनही पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे प्लॉट वाटप करण्यात आलेले नाही.

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक पात्र नागरिक आजही निवासाच्या जागेपासून वंचित आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून शासनाच्या प्रचलित नियम व निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना १० दिवसांच्या आत प्लॉटचे वाटप करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शंकर महाजन, रवी पंडित, संजय टिके, अमृत नरंगलकर, गणपत सवयी सोनकांबळे, गौतम डुमणे आदींच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. तसेच शासनाच्या नावावर असलेल्या संबंधित जमिनीवर कोणाचे अनधिकृत अतिक्रमण किंवा कब्जा असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. ही मागणी एका दिवसाची नसून सन १९८४ पासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या हक्काची आहे. प्रशासनाने दिरंगाई न करता तातडीने कार्यवाही करावी, असे शंकर महाजन यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, १० दिवसांच्या आत प्लॉट वाटपाबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंधित लाभार्थी व गावकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.

Tags: MaharashtraNaigaonPolitical
Previous Post

यवतमाळ: पाच दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; प्रशासकीय उदासीनतेविरुद्ध डॉ. नीरज वाघमारे आक्रमक

Next Post

शिरड-शहापूरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी; सामाजिक एकतेचा दिला संदेश

Next Post
शिरड-शहापूरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी; सामाजिक एकतेचा दिला संदेश

शिरड-शहापूरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी; सामाजिक एकतेचा दिला संदेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home