Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

mosami kewat by mosami kewat
September 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा
       
तिवसा : सारसी येथील प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून माहुली जहागीर परिसरात वाद निर्माण झाला असून, प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतरही ग्रामपंचायतीचे लेटरहेड व शिक्के वापरून १५ सप्टेंबर रोजी ग्रामसभा बोलावण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. तिवसा तहसीलदारांनी या प्रकरणात स्थगिती दिलेली असताना ही ग्रामसभा घेणे बेकायदेशीर असल्याने  ‘वंचित’ने ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज माहुली जहागीर पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. प्रशासकाचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजीच संपलेला असताना त्यानंतर ग्रामपंचायतीच्या अधिकृत लेटरहेड व शिक्क्यांचा वापर करून ग्रामसभा बोलावणे नियमबाह्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सारसी येथील प्रवेशद्वाराच्या प्रश्नावर तिवसा तहसीलदारांनी स्थगिती आदेश दिलेला असतानाही ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ‘वंचित’ने केली आहे. या ग्रामसभेमुळे अल्पसंख्याक बौद्ध समूहाच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता असून, गावातील सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही संघटनेने दिला. गावातील परिस्थिती चिघळू नये यासाठी संबंधित ग्रामसभा तात्काळ रद्द करावी आणि नियमबाह्य प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली.

“सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही. ग्रामसभा रद्द न झाल्यास आरपारचा लढा उभारला जाईल,” असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.

Tags: MaharashtraTivsaVanchit Bahujan Aghadi
Previous Post

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Next Post

वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर

Next Post
वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर

वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ - सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home