Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

MPSC पेपरफुटी: वंचित बहुजन आघाडी MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आंदोलनाला जाहीर पाठिंबा

mosami kewat by mosami kewat
September 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
MPSC पेपरफुटी: वंचित बहुजन आघाडी MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आंदोलनाला जाहीर पाठिंबा
       
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भोंगळ कारभारावर आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवरून सध्या राज्यभरातील परीक्षार्थींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींचे भविष्य या भ्रष्ट व्यवस्थेमुळे अंधारात सापडले असून विद्यार्थ्यांचा प्रशासनावरील विश्वास पार उडाला आहे. या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षार्थींच्या या हक्काच्या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने (VBA) खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससीच्या कारभाराविरोधात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने आपला पूर्ण आणि जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राजेंद्र पातोडे यांनी म्हटले की,”MPSC मधील सावळागोंधळ आणि भ्रष्टाचाराने मेहनती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांचा आवाज आता शासन किंवा प्रशासन दाबू शकत नाही,” असा सणसणीत इशारा पातोडे यांनी दिला आहे.

त्याचप्रमाणे, पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि MPSC विद्यार्थ्यांनी निघणाऱ्या या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे जाहीर आवाहनही त्यांनी केले आहे.

Tags: EducationMaharashtraMPSC Paper LeakPoliticalpunestudentstudent protestVanchit Bahujan Aghadi
Previous Post

विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर

Next Post

सरकारची उच्चस्तरीय समिती म्हणजे परीक्षा घोटाळ्यांची अभय योजना – राजेंद्र पातोडे

Next Post
सरकारची उच्चस्तरीय समिती म्हणजे परीक्षा घोटाळ्यांची अभय योजना – राजेंद्र पातोडे

सरकारची उच्चस्तरीय समिती म्हणजे परीक्षा घोटाळ्यांची अभय योजना - राजेंद्र पातोडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका
बातमी

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

by mosami kewat
October 18, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी त्याचे आई वडील बऱ्याच दिवसापासून आंदोलन करत आहेत. मात्र...

Read moreDetails
आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

October 18, 2026
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

October 18, 2026
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

October 18, 2026
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home