Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी
       

प्रा. डुल्ला यांना तत्काळ अटक करा; जातीय भेदभाव व मानसिक छळाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित युवा आघाडीची मागणी

चंद्रपूर : आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेणाऱ्या साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध CBI चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले जातीय भेदभाव, अपमान व मानसिक छळाचे आरोप, तसेच परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि त्यांच्या चारित्र्याबाबत प्रसारित झालेल्या माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. उपलब्ध पुरावे, संबंधितांचे जबाब आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणीही करण्यात आली.

आरोप चौकशीत सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच चुकीची अथवा खोटी माहिती प्रसारित झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका संघटनांनी मांडली. प्रा. सूर्यकुमार डुल्ला यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्यास, त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारावी. आयआयटीसह उच्च शिक्षण संस्थांमध्ये SC, ST आणि OBC प्रवर्गातील प्राध्यापकांची आरक्षणानुसार प्रलंबित भरती पूर्ण करावी. प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना संविधानिक मूल्ये, समानता व विद्यार्थी अधिकारांबाबत प्रशिक्षण द्यावे. तसेच जातीय भेदभावाच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्पष्ट SOP लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली.

“चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. कोणालाही संस्थात्मक संरक्षण मिळता कामा नये,” अशी भूमिका वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशी, आरोपांची स्वतंत्र चौकशी आणि कायद्यानुसार आवश्यक कारवाईबाबत प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे. मागण्यांवर समाधानकारक कार्यवाही न झाल्यास चंद्रपुरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडीने दिला. आंदोलनाची पुढील दिशा प्रशासनाच्या भूमिकेनुसार निश्चित करण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वंचित युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत गोडबोले, सिद्धांत पुणेकर, हर्षवर्धन कोठारकर, अभिलाष चुनारकर, नकुल कांबळे, प्रतीक वाघमारे, सुदेश शिंगाडे, प्रजय देवगडे, कुणाल उराडे, आनंद वासनिक, अजय उराडे, अविनाश वाळके, श्रुती दुर्गे, सिद्धार्थ भैसारे, राकेश पेटकर, राहुल गौरकार, डॉ. प्रज्ञाशील सहारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविताताई गौरकार, महिला आघाडी महानगराध्यक्ष तनुजाताई रायपुरे, मोनाली पाटील, अनिता खरतड, पुष्पा कोटांगले, दिलीप मेश्राम यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: chandrapurIITIIT BombayMaharashtraPoliticalSamyak Students MovementVanchit Bahujan Aghadi
Previous Post

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

Next Post

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

Next Post
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी
Uncategorized

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

by Akash Shelar
November 8, 2026
0

मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक व सामाजिक होरपळ तसेच दुष्काळ निवारणाबाबत...

Read moreDetails
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

November 7, 2026
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

November 6, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

November 5, 2026
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home