Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर

mosami kewat by mosami kewat
September 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर
       

भेंडीला दोन रुपये किलो भाव

अमरावती : विदर्भातील शेतकरी संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत अवघ्या २४ तासांत पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, पावसातील खंड आणि वाढती कर्जफेडीची चिंता या पार्श्वभूमीवर या घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.

आत्महत्या केलेल्यांमध्ये नामदेव रामचंद्र तायडे (७०, दर्याबाद), गजानन विनायक काळमेघ (७०, धामणगाव रेल्वे), दिनेश नारायण राऊत (४५, खेडपिंपरी, ता. नांदगावखंडेश्वर), आनंदराव राजाराम खाडे (८५, कामरगाव) आणि विष्णू सदानंद मेटकर (२३, नगरवाडी, ता. महागाव) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव तायडे यांनी शेतीसाठी पीककर्ज घेतले होते. पत्नीच्या नावावरही शेतीसाठी कर्ज असल्याचे सांगितले जाते. पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पिकांच्या उत्पन्नाबाबतची चिंता वाढली होती. त्यातून त्यांनी घरात कीटकनाशक प्राशन केले. गजानन काळमेघ यांनीही नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.

दरम्यान, दिनेश राऊत यांनी सातेफळ फाट्याजवळील ढाब्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. तर आनंदराव खाडे हे कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने नाराज होते. त्यातच पावसातील खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. घटलेले कापसाचे उत्पादन, अत्यल्प पाऊस आणि कर्जबाजारीपणामुळे शनिवारी विष्णू मेटकर यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

भेंडीला दोन रुपये किलो भाव; शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले पीक

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचे आणखी एक धक्कादायक चित्र समोर आले आहे. जळू येथील शेतकरी चंद्रसिंग शांताराम पाटील यांनी दोन एकर क्षेत्रात मोठ्या आशेने भेंडीची लागवड केली होती. मशागत, नांगरणी, रोटाव्हेटर, बियाणे, लागवड, रासायनिक खते, कीटकनाशकांची फवारणी, निंदणी, तोडणी मजुरी आणि वाहतूक यासाठी आतापर्यंत सुमारे सव्वा ते दीड लाख रुपये खर्च झाला.

या पिकातून सुमारे ७० क्विंटल उत्पादन मिळाले. मात्र कासोदा बाजारात व्यापाऱ्यांकडून भेंडीला अवघा दोन रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने पाटील हवालदिल झाले. उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही बाजारभाव मिळत नसल्याने संतापलेल्या पाटील यांनी विक्रीसाठी आणलेली संपूर्ण भेंडी रस्त्यावर फेकून देत आपला रोष व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून राज्य सरकारवरही टीकेची झोड उठली आहे. एकीकडे विविध योजनांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. कर्जबाजारीपणा, पीकविमा, हमीभाव, नापिकी, सिंचन आणि शेतीमालाला योग्य बाजारभाव या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्या आर्थिक अडचणींच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने (VBA) वेळोवेळी आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना, शेतीमालाला योग्य भाव, पीकविमा आणि शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडी सातत्याने मांडत आली आहे. विदर्भात अवघ्या २४ तासांत पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


       
Tags: AgricultureCrop DamageFarmer IssuesFarmer suicideMaharashtra
Previous Post

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

Next Post

MPSC पेपरफुटी: वंचित बहुजन आघाडी MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आंदोलनाला जाहीर पाठिंबा

Next Post
MPSC पेपरफुटी: वंचित बहुजन आघाडी MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आंदोलनाला जाहीर पाठिंबा

MPSC पेपरफुटी: वंचित बहुजन आघाडी MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आंदोलनाला जाहीर पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका
बातमी

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

by mosami kewat
October 18, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी त्याचे आई वडील बऱ्याच दिवसापासून आंदोलन करत आहेत. मात्र...

Read moreDetails
आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

October 18, 2026
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

October 18, 2026
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

October 18, 2026
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home