Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

mosami kewat by mosami kewat
July 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली
       
दर्यापूर (अमरावती) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी (दि. २३ जुलै) दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला दर्यापूर शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गुरुवारी सकाळी ११ वाजता गांधी चौक येथून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य निषेध रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान व्यापारी व नागरिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे शहरातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणात बंद राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अमरावती पश्चिम जिल्हा प्रमुख संजय चौरपगार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचा उल्लेख करत, “न्याय, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर झालेला कथित लाठीचार्ज हा लोकशाहीवरील आघात असून हा लोकशाहीचा अपमान नाही का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Tags: MaharashtraNEET Paper LeakPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद

Next Post

विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा 'सब-सेंटर' : ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home