Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद

mosami kewat by mosami kewat
July 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद
       
उमरखेड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या गुरुवारी (दि. २३) महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला उमरखेड शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता.

जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर आणि तालुकाध्यक्ष संबोधी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठ, महागाव रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खडकपुरा, सराफा लाईन, नाग चौक, नांदेड रोड आणि माहेश्वरी चौक या मार्गांवरून रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

या आंदोलनात विश्वास धुळे, भारतीय बौद्ध महासभेचे धम्मदीप काळबांडे, तालुकाध्यक्ष जी. एन. कांबळे, समता सैनिक दलाचे राजेसाहेब पंडित, रिटायर कर्मचारी असोसिएशनचे यशवंत काळबांडे, राजेश घुगरे, सिद्धार्थ धोंगडे, संतोष गायकवाड, सचिन खंदारे, गजानन भालेराव, एस. के. मुनेश्वर, गोपीनाथ नरवाडे, योगेश गायकवाड, गणेशराव कोकणे, सारीपुत वाहुळे, बाबुराव नवसागरे, अरविंद धोंगडे, पंकज धोंगडे, शीलरत्न जाधव, राहुल लोमटे, चंद्रकांत पंडित, राजाराम काकडे, धम्मदीप पाईकराव, सैनिक देवानंद पाईकराव, कमलबाई मुनेश्वर, जिजाबाई खंदारे, बर्डे ताई, खंदारे ताई, धुळे ताई यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Tags: MaharashtraMaharashtra BandhNeet ExamNEET Paper LeakPoliticalUmarkhed
Previous Post

येवल्यात मंत्री छगन भुजबळांना वंचित बहुजन युवा आघाडीकडून काळे झेंडे; सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध

Next Post

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home