Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी – अॅड. प्रकाश आंबेडकर

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 9, 2025
in बातमी
0
मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी – अॅड. प्रकाश आंबेडकर
       
मुंबई : आज सकाळी दिवा ते मुंब्रा स्थानकावर घडलेली रेल्वे दुर्घटना ही अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे. अनेक निष्पाप प्रवाशांचा जीव गमावणे ही गोष्ट कोणत्याही संवेदनशील समाजासाठी असह्य आहे. जर भारतीय रेल्वेने सोशल मीडियावरील रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले असते, तर हे कधीच घडले नसते. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रित धोरण राबवले असते, आणि सोशल मीडियावरील दिखाऊपणाऐवजी प्रत्यक्ष सुरक्षेवर लक्ष दिले असते, तर ही दुर्घटना टाळता आली असती.

मी शासनाकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे या घटनेची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करतो, जेणेकरून संपूर्ण सत्य जनतेसमोर येईल आणि जबाबदारी निश्चित होईल. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून केली. दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना तत्काळ आर्थिक आणि वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक आहे. अशा प्रसंगी सरकारने संवेदनशीलता आणि तत्परता दाखवावी. ही दुर्घटना केवळ एक अपघात म्हणून न नोंदवता एक चेतावणी म्हणून पाहण्याची गरज आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणांमध्ये मूलगामी सुधारणा आणि धोरणात्मक कृती आवश्यक आहेत. असेही ते म्हणाले.

Tags: accidentAdv. Prakash AmbedkarextremelyheartbreakingincidentMaharashtramumbaiPrakash AmbedkarSADtrainVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

Next Post

ग्वालियर खंडपीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा विरोध एक जातीयवादी मानसिकतेचा प्रताप – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
ग्वालियर खंडपीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा विरोध एक जातीयवादी मानसिकतेचा प्रताप – ॲड. प्रकाश आंबेडकर

ग्वालियर खंडपीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा विरोध एक जातीयवादी मानसिकतेचा प्रताप - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अनुयायांच्या सोयीसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर मैदानात; सोयी-सुविधांचा घेतला आढावा
बातमी

अनुयायांच्या सोयीसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर मैदानात; सोयी-सुविधांचा घेतला आढावा

by mosami kewat
December 5, 2025
0

मुंबई : महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून देशभरातून मुंबईत दाखल झालेल्या अनुयायांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी वंचित बहुजन...

Read moreDetails
महापरिनिर्वाण दिनी अनुयायांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडीचे स्वयंसेवक सज्ज; गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

महापरिनिर्वाण दिनी अनुयायांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडीचे स्वयंसेवक सज्ज; गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

December 5, 2025
ज. वि. पवार यांच्या 'आंबेडकरी चळवळ: दशा दुर्दशा आणि दिशा' पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

ज. वि. पवार यांच्या ‘आंबेडकरी चळवळ: दशा दुर्दशा आणि दिशा’ पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

December 5, 2025
संविधानाच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरवादी संघर्ष करत राहतील: चैत्यभूमीवर VBA च्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद

संविधानाच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरवादी संघर्ष करत राहतील: चैत्यभूमीवर VBA च्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद

December 5, 2025
पिंपरीत किवळे-रावेत मेट्रो मार्गाच्या DPR साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

पिंपरीत किवळे-रावेत मेट्रो मार्गाच्या DPR साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

December 4, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home