Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ग्वालियर खंडपीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा विरोध एक जातीयवादी मानसिकतेचा प्रताप – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 9, 2025
in बातमी
0
ग्वालियर खंडपीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा विरोध एक जातीयवादी मानसिकतेचा प्रताप – ॲड. प्रकाश आंबेडकर
       
मुंबई – मध्य प्रदेशच्या ग्वालियर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आंबेडकरवादी वकिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापनेची केलेली मागणी व त्यावरून उभा राहिलेला वाद हा केवळ दुर्दैवी नाही, तर जातीय अहंकाराचा आणि मनुवादी विचारांचा स्पष्ट पुरावा आहे.

१९ मार्च २०२५ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश यांनी या पुतळ्याच्या स्थापनेला स्पष्ट आणि अधिकृत मंजुरी दिली असून ती न्यायालयीन रेकॉर्डमध्ये ही नमूद आहे. यानंतरही काही मनुवादी वकिलांनी या ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या निर्णयाला विरोध करत अनेक खोट्या आणि निराधार आरोपांचे साहाय्य घेतले, जसे की प्रक्रिया त्रुटी, निधीचा गैरवापर, बार असोसिएशनला पूर्वसूचना न देणे, इत्यादी. या विरोधकांनी इतकेच नव्हे तर “ना पुतळा बसेल, ना टिकेल!” असा उघडपणे धमकीवजा इशाराही दिला.

२६ मार्च २०२५ रोजी माननीय मुख्य न्यायाधीशांनी पुन्हा आदेश देत सांगितले की, काही व्यक्तींनी विरोध केला, तरी त्याकडे दुर्लक्ष करून, सर्वोच्च न्यायालयात बाबासाहेबांचा पुतळा ज्याप्रकारे बसवण्यात आला, त्याचप्रमाणे ग्वालियर खंडपीठातही काम पूर्ण करावे.

जगभरात बाबासाहेबांच्या विचारांचे आणि कार्याचे कौतुक होत असताना, भारतात अजूनही ब्राह्मणवादी आणि मनुवादी शक्ती बाबासाहेबांविषयी द्वेष पसरवत आहेत, हे अत्यंत खेदजनक आहे.

मी ग्वालियर खंडपीठातील आंबेडकरवादी वकिलांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि सर्व आंबेडकरी समाजाला आवाहन करतो की त्यांनी या जातीयवादी विरोधाचा तीव्र शब्दांत निषेध करावा. हा लढा फक्त पुतळ्याचा नाही, तर विचारांचा आहे — समता, न्याय आणि स्वाभिमानासाठीचा, असे ट्विट करत त्यांनी याविषयी भूमिका मांडली.

Tags: Adv. Prakash AmbedkarBabasaheb Ambedkar'scommunalGwalior BenchinstallationMaharashtramanifestationmindsetOppositionstatueVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी – अॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post

स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता ; ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

Next Post
स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता ; ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता ; ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home