Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

mosami kewat by mosami kewat
October 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
       
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर सम्यक विद्यार्थी आंदोलनाने या ठरावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारांवर गदा आणणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, तसेच अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी करून सम्यक विद्यार्थी आंदोलनाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यात आले. विद्यापीठ परिसरातील आंदोलन, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर करताना वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आयोजित केलेल्या विद्यार्थी आक्रोश मोर्चाचा उल्लेख करण्यात आल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलन ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि लोकशाही हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी तसेच संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी काम करणारी संघटना आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा वारसा पुढे नेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे ही संघटनेची भूमिका असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाने नागरिकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य, शांततापूर्ण सभा घेण्याचा आणि निषेध नोंदवण्याचा अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व लोकशाही हक्कांचे संरक्षण करणे ही विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे आंदोलनानंतर निर्बंध घालणारा ठराव मंजूर करण्याच्या भूमिकेला संघटनेने विरोध केला आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पाच प्रमुख मागण्या

– विद्यापीठ परिसरातील शांततापूर्ण आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा संबंधित ठराव तात्काळ मागे घ्यावा. 

– अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी करून सम्यक विद्यार्थी आंदोलनाची जाहीर माफी मागावी. 

– विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा, शांततापूर्ण आंदोलनाचा आणि संविधानिक अधिकारांचा सन्मान राखण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. 

– विद्यार्थी संघटनांबाबत भेदभावपूर्ण किंवा निवडक कारवाई केली जाणार नाही, याची हमी द्यावी. 

-तसेच निवेदनातील मागण्यांवर लेखी उत्तर देऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठराव तात्काळ मागे घ्यावा आणि अधिकृत प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर माफी मागावी, असे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. अन्यथा लोकशाही आणि संविधानिक मार्गाने अधिक तीव्र भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचे हक्क, संविधानिक मूल्ये आणि आंबेडकरी विद्यार्थी चळवळीचा सन्मान याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यापीठ प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केले आहे.

Tags: MaharashtraPoliticalpuneSamyak Vidyarthi AndolanSavitribai Phule Pune UniversityVanchit Bahujan Aghadi
Previous Post

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home