पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत युवा पक्षनेते सुजात आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटन बांधणी, निवडणूक पूर्व तयारी, झेन जी कार्यक्रम, आरक्षण बचाव यात्रा आणि पुढील तीन महिन्यांचे नियोजन याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार पक्षाच्या संघटनात्मक आढाव्यासाठी नाशिक विभागीय आढावा बैठक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी, मराठवाडा विभागीय आढावा बैठक जालना येथे १३ ऑक्टोबर २०२६ रोजी, नागपूर विभाग आढावा बैठक १८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे आणि अमरावती विभागीय बैठक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
सुजात आंबेडकर यांचा झेन जी टाउनहॉल कार्यक्रम ३१ ऑक्टोबर रोजी नांदेड आणि १९ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे घेण्यात येणार आहे. याशिवाय पक्षाचे नगरसेवक यांचे प्रशिक्षण, दुष्काळ परिषद आयोजित करणे, बिऱ्हाड आंदोलन आणि एसआयआर, निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्याचेही निर्णय बैठकीत घेण्यात आले.
केंद्रीय कमिटी सदस्य दिशा पिंकी शेख, राज्य कमिटी पदाधिकारी नागोराव पांचाळ, सारंग थोरात, उत्तम वनशिव, जितरत्न पटाईत, अरुण जाधव, प्रशांत इंगोले, दीपक डोके, डॉ. चित्रा कुऱ्हे, ज्ञानेश्वर कवठेकर, सर्वजित बनसोडे, ज्ञानेश्वर कवठेकर, कृष्णा देशमुख तसेच ऍक्शन कमिटी सदस्य उत्कर्षा रूपवते आणि चेतन गांगुर्डे प्रामुख्याने उपस्थित होते.





