Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

शॉर्ट्सच्या युगात हरवत चाललेला सखोल विचार?

mosami kewat by mosami kewat
June 24, 2026
in article, अर्थ विषयक, सामाजिक
0
शॉर्ट्सच्या युगात हरवत चाललेला सखोल विचार?

शॉर्ट्सच्या युगात हरवत चाललेला सखोल विचार?

       

– संजीव चांदोरकर

लाँग (नेटफ्लिक) विरुद्ध शॉर्ट (इंस्टाग्राम, टिकटॉक, यूट्यूब)

आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या अनेक गोष्टीत छोटे छोटे बदल होत असतात ; ते कदाचित दीर्घकालीन ट्रेंडचे दिशा बाण असू शकतात !

Netflix हा ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या ओळखीचा आहेच. या कंपनीचा शेयरचा भाव गेल्या वर्षभरात ४२ टक्यांनी खाली आला आहे; याच काळात अमेरिकन शेयर बाजार, विशेषतः Nasdaq ऐतिहासिक उंचीवर गेले होते.

फक्त काही महिन्यापूर्वी नेटफ्लिक्स अमेरिकेत आघाडीवरच्या टेक स्टॉक मध्ये गणला जायचा

टीव्ही, स्मार्टफोन आणि तत्सम इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर दर्शक नक्की काय बघतात याचे ट्रॅकिंग ठेवणे आता कन्टेन्ट बनवणाऱ्या आणि आपल्या पर्यंत पोचवणाऱ्या कंपन्यांना सोपे झाले आहे. कारण बहुतांश उपकरणे इंटरनेटला जोडलेली असतात. दर्शकांचे प्रत्येक मिनिट ट्रॅक होते.

कन्टेन्टची लांबी किती यावरून त्याला लाँग किंवा शॉर्ट फॉरमॅट म्हणतात. आकडेवारी सांगते आहे की जमाना शॉर्ट्सचा आला आहे.

गेली अनेक वर्षे नेटफ्लिकचे सामर्थ्य लाँग फॉरमॅट फिल्मचे राहिले आहे. पण नेटफ्लिक्सच्या वर्गणीदार दर्शकांची किंवा खरेतर डोळ्यांची बुबुळे लावून बघणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. नेटफ्लिक्सच्या शेयरचा भाव खाली येण्याचे हे कारण आहे.

इन्स्टाग्रामवर तरुण जेवढा वेळ असतात त्यातील अर्धा वेळ Reels बघत असतात. टिकटॉक चे उत्पन्न गेल्या सात वर्षात दहा पटींनी वाढले आहे. यूट्यूबवर छोट्या शॉर्ट, फिल्म्स बघणारे नेटफ्लिक्स पेक्षा जास्त आहेत

ही सारी निरीक्षणे अमेरिकेतील आहेत. पण भारताची गाडी, विशेषतः तरुण पिढीची, त्याच रुळावरून चालली आहे. अमेरिकेला जे स्टेशन लागले ते आज ना उद्या भारताला देखील लागणार आहे हे नक्की.

मुद्दा सोशल मीडिया किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म , त्यांची दर्शक संख्या , त्यांचे उत्पन्न , त्यांच्या शेयरचे भाव याच्या पलीकडचा आहे.

तरुण पिढीच्या काय पाहायचे , काय वाचायचे, काय ऐकायचे , यांचे प्राधान्यक्रम बदलत आहेत हे नक्की.

शॉर्ट फॉरमॅटना तरुण वर्गाकडून प्राधान्य मिळत असेल तर त्याचा अर्थ कसा लावायचा ? त्याचा सबंध त्यांच्या attention span शी आहे का ? याचे पुढचे टोक तरुणांना सारे काही क्विक फिक्स हवे आहे इथपर्यंत जाऊन पोचते का ? मग ते राजकीय नेतृत्व असो कि त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ? मग मेंदूचा सकस आहार म्हणाजे काय?

साठी / सत्तरी मध्ये टीनएज मध्ये असणाऱ्या आमच्या पिढी मध्ये शाळेच्या, कॉलेजच्या दिवसात पाहिलेली पूर्ण लांबीची एखादी फिल्म, नाटक, पुस्तक पन्नास / साठ वर्षानंतर अजूनही स्मरणात असल्याचे, आणि त्याचा आपल्या आयुष्यावर , मनावर , विचारांवर खोलवर विधायक परिणाम झाला असे सांगणारे अनेक आहेत.

हा वरकरणी वाटतो तसा तरुण पिढीचा व्यक्तिगत चॉईस पुरता मर्यादित प्रश्न नाही.

या बदलांचे भविष्यातील समाज, राष्ट्र, जग यांच्यासाठी सामाजिक, राजकीय, वैचारिक अर्थ लावण्याची गरज आहे.

संदर्भ : Scott Galloway Newsletter


       
Tags: facebookInstagramOTT PlatformsreelsShort form Contentsmart phoneSocial Media ConsumptionVedio
Previous Post

भूमिगत गटार कामाची नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून पाहणी; दर्जेदार कामासह रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना

Next Post

मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन

Next Post
मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन

मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!
article

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

by mosami kewat
August 24, 2026
0

- अनंतराव सरवदे भारतात आरक्षणाचा विषय निघाला की, अनुसूचित जाती जमातींवर सरकार किती खर्च करते, आरक्षणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती भार...

Read moreDetails
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

August 24, 2026
Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

August 24, 2026
महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

August 23, 2026
मनमाडकरांचा अजंता एक्स्प्रेसच्या विस्ताराला तीव्र विरोध; निर्णय झाल्यास ‘रेल रोको’चा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

मनमाडकरांचा अजंता एक्स्प्रेसच्या विस्ताराला तीव्र विरोध; निर्णय झाल्यास ‘रेल रोको’चा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

August 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home